Nagpur News .jpg Sarkarnama
विदर्भ

Nagpur News: धक्कादायक! सुट्टीच्या दिवशी 'बार'मध्ये सरकारी फाईल? पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; वडेट्टीवारांनीही बार उडवला

Crime News : विशेष म्हणजे बारमधील फाईलवरून विरोधक महायुती सरकारवर चांगलेच तुटून पडले आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी पैसा आणि नशा एवढेच काम आता काही सरकारी बाबूंना उरले का? असा सवाल केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : बारमध्ये बसून शासकीय फाईलवर भराभर स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचा सीसीटीव्हीच्या फुटेजने नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तो शासकीय अधिकारी कोण याचा सध्या शोध घेतला जात आहे.

संबंधित बारचे सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाच्यावतीने मागण्यात आले असले तरी या प्रकरणी अद्याप कोणावरच गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पालकमंत्री या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे.

नागपूरमधील (Nagpur) मनीषनगर येथील एका बारमध्ये सरकारी फाईलवर स्वाक्षऱ्या करीत एका अधिकाऱ्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकारी सुमारे तासभर या बारमध्ये बसला होता असेही सांगण्यात येते.

ज्या बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त सरकारी फाईल दिसत आहे. हे बघता संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा चेहराही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असावा. हे लक्षात घेऊन त्याचा शोध घेतला जात आहे.

प्रशासनाच्यावतीने या प्रकरणावर कोणीच बोलण्यास तयार नाही. मात्र या प्रकरणाची गोपनीय यौकशी सुरू असल्याचे पुढे आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे बारमधील फाईलवरून विरोधक महायुती सरकारवर चांगलेच तुटून पडले आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी पैसा आणि नशा एवढेच काम आता काही सरकारी बाबूंना उरले का? असा सवाल केला आहे.

विजय वडेट्टीवारांनी ‘ना जबाबदारी, ना भीती...दारूचा घोट, टेबलाखालून पैशाची नोट', असा टोला सरकारला लगावला. त्यांनी सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हे बाघता विरोधकांना महायुती सरकारच्या विरोधात आरोप करण्यासाठी आणखी एक मुद्दा हाती लागला आहे.

हा बार आणि मनीषनगर परिसर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात येत असल्याने विरोधकांच्या आरोपांची धार आणखीच वाढणार असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT