Governor Ramesh Bais and Shankarbaba Papalkar Sarkarnama
विदर्भ

Governor In Amravati : १७ सप्टेंबरला राज्यपाल बैस जाणार शंकरबाबांच्या वझ्झरला, 'हे' आहे कारण !

Atul Mehere

Amravati District News : अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी रविवारी (ता. तीन) नागपूर येथील राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन वझ्झर मॉडेलसंदर्भात माहिती दिली. या भेटीत १८ वर्षांवरील बेवारस, दिव्यांग, अंध मुलांच्या पुनर्वसनासाठी कायदा करण्याबाबत चर्चा केली. (Discussed about legislation for rehabilitation of blind children)

राज्यपालांनी १७ सप्टेंबर रोजी वझ्झरला भेट देऊन वझ्झर मॉडेल समजून घेण्याचे आणि येत्या तीन दिवसांत सचिव स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन शंकरबाबांना दिले. एखाद्या कुटुंबात मतिमंद किंवा अपंग मूल जन्माला आले असेल तर आपण कायमचे खचून जातो.

अशा स्थितीत आपण तब्बल १२३ मुलांचा श्रद्धेने सांभाळ करता, ही छोटी बाब नाही, असे राज्यपाल (Governor) शंकरबाबांना म्हणाले. हा विषय अतिशय गंभीर असून आपण यात स्वतः लक्ष घालू. शिवाय देशपातळीवर हा कायदा व्हावा, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही विनंती करणार असल्याचे राज्यपाल बैस यांनी म्हटले.

जवळपास २५ मिनिटे राज्यपाल बैस यांनी शंकरबाबा पापळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करीत पुनर्वसन कायद्याचे महत्त्व समजून घेतले. महाराष्ट्रात (Maharashtra) दरवर्षी एक हजाराहून अधिक बेवारस मुले-मुली बालसुधारगृहाबाहेर पडल्यानंतर जातात कुठे, या प्रश्नाने स्वतः राज्यपाल अस्वस्थ झाले.

१८ वर्षांवरील बेवारस व अंध, अपंग या मुलांना जगवायचे असेल तर त्यांना आरक्षण नव्हे तर पुनर्वसनाची खरी गरज असल्याचे शंकरबाबांनी राज्यपालांना सांगितले. त्याशिवाय अनाथ आणि बेवारस यातील फरकही त्यांना सांगितला.

शंकरबाबा पापळकर हे अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृह या संस्थेच्या माध्यमातून १२५ बेवारस, दिव्यांग, मतिमंद तसेच अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ करतात. अनाथ असलेल्या मतिमंद तसेच दिव्यांग मुलांना बालसंगोपन केंद्रात केवळ १८ वर्षापर्यंतच ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

त्यानंतर त्यांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे अशा मुलांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन आवश्यक आहे. शंकर बाबा अठरा वर्षानंतरही अशा मुलांचा सांभाळ करतात. या संस्थेची व त्याद्वारे करण्यात येत असलेल्या सर्व कार्याची माहितीही शंकरबाबांनी राज्यपालांना दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT