Amravati Double Murder Case : कोल्डब्लडेड डबल मर्डर, थक्क करणारी हिस्ट्री; पोलिसांनी उलगडले रहस्य !

Dangerous criminals : सराईत गुन्हेगाराने केलेल्या कृत्यापेक्षाही भयंकर व थक्क करणारा आहे.
Crime
CrimeSarkarnama
Published on
Updated on

Amravati District Crime News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या शिवाजीनगर भागात आई आणि लहान भावाची हत्या करण्यासाठी ज्या पद्धतीने युवकाने प्लॅन रचला, तो एखाद्या सराईत गुन्हेगाराने केलेल्या कृत्यापेक्षाही भयंकर व थक्क करणारा आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याप्रकरणात पसार सौरभला अटक केल्यानंतर त्याने रचलेल्या प्लॅनचा उलगडा पोलिसांपुढे केला. (He explained his plan to the police)

हत्या (Murder) केल्यानंतर सौरभने आई नीलिमा गणेश कापसे व भाऊ आयुष गणेश कापसे या दोघांचेही मोबाईल स्वत:जवळ घेऊन ते आधी स्वीचऑफ करून ठेवले. स्वत:चाही मोबाईल त्याने बंद केला. तीनही फोन आणि भावाचा लॅपटॉप सोबत घेऊन त्याने घर सोडले. मोर्शीत फिरल्यानंतर सौरभ अमरावतीमध्ये (Amravati) आला. येथून नागपूर व शिर्डी मार्गाने तेलंगणा हैदराबादमध्ये गेला व तेथे एका लॉजमध्ये थांबला.

त्याठिकाणी त्याने स्वत:चे मूळ नाव न सांगता आकाश रमेश रहाटे, असे बनावट नाव सांगितले. परंतु पोलिसांनी (Police) तांत्रिक तपास करून त्याच्यापर्यंत पोहोचून दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे, निरीक्षक किरण वानखडे यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाणे, पंकज फाटे, सचिन मिश्रा, रवींद्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, शकील चव्हाण, शिवा शिरसाट, रितेश वानखडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

औषधी वनस्पतींचा प्रयोग फसला..

आईसह भावाची हत्या करण्यासाठी सौरभने ऑनलाइन पद्धतीने औषधी वनस्पती अन्नातून जास्त प्रमाणात दिल्यास त्याचे विषात रूपांतर होऊ शकते, हा प्रयोग केला. जेवणातून आई व भावाला त्या वनस्पती दिल्या होत्या. परंतु त्याचा हा प्रयोग फसला.

Crime
Amravati Gavathi Bomb News : २८ गावठी बॉंम्बसह दोघांना अटक, जंगली डुकरांच्या शिकारीसाठी वापरत होते बॉम्ब !

प्लास्टिक तडव आणून मृतदेह गुंडाळले..

झोपेतच आई आणि लहान भावाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेहांची दुर्गंधी पसरू नये, म्हणून बाजारातून प्लॅस्टिकचे तडव आणून मृतदेहाभोवती गुंडाळले व दिवाणच्या एकाच बॉक्समध्ये ठेवले. त्यावर गादी आणि ब्लँकेट टाकून घराला कुलूप लावून सौरभ पसार झाला.

सदर प्रकरणामध्ये ज्या आरोग्यसेवकाने घरी येऊन दोघांना सलाईन लावून दिली होती, त्याची आणि गुंगीचे औषध आणताना ज्या मेडिकल व्यावसायिकाचा परवाना सौरभने वापरला त्याच्यासह इतरांचीही याप्रकरणात चौकशी केल्या जाईल, असे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com