Bhandara : मराठवाड्यातून एन्ट्री केलेल्या बीआरएसने विदर्भात आपला झेंडा भक्कमपणे रोवला आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच निवडणुकात उतरलेल्या भारत राष्ट्र समितीने (BRS) घवघवीत यश संपादन केले आहे.
भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या गेल्या. बीआरएसचे ११ ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. यानिमित्ताने चरण वाघमारेंनी भाजपची चांगलीच कोंडी केल्याचे बोलले जाते. खासदार सुनील मेंढे, राज्याचे माजी राज्यमंत्री तथा ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाला जबर धक्का दिला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असला तरी काँग्रेसला फारशे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध बीआरएस यांनीच आपले सरपंच निवडून आणले आहे, तर भंडारा जिल्ह्यात गुलाबी वादळ आल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना घाम फुटणार हे मात्र निश्चित आहे.
जालना जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. चार वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये चार जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकामध्ये शिंदे गटाला एक, तर काँग्रेसला दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आलं आहे, तर भोकरदन तालुक्यातील विटा रामनगर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे मावस जावई यांचा पराभव झाला आहे. ज्ञानेश्वर पुंगळे असे त्यांचे नाव आहे. त्यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. या ठिकाणी म्हणजे रामनगर विटा ही ग्रामपंचायत अपक्षांच्या ताब्यात गेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनेक ग्रामपंचायतीत विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली- देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवलीमधील अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपने, दोन ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेने, तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे. या मतदारसंघात आमदार नितेश राणेंचं गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मात्र कणकवली तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत निवडणूक भाजप व ठाकरे सेनेने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये बेळणे ग्रामपंचायत भाजपकडून हिसकावून घेण्यात ठाकरे सेनेला यश आले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.