Amol Kolhe: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना दणका; ठाकरे गटाकडे एकहाती सत्ता

Gram Panchayat Elections Result 2023 : १७ पैकी १६ उमेदवार विजयी झाले असून, सरपंचपद हे ठाकरे गटाकडे आले आहे.
Gram Panchayat Elections Result 2023
Gram Panchayat Elections Result 2023 Sarkarnama
Published on
Updated on

Pune : ग्रामपंचायत निवडणूक निकाल अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल येत आहेत. जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. येथे ठाकरे गटाने एकहाती सत्ता राखली आहे. नारायणगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचे गाव आहे. (Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result)

Gram Panchayat Elections Result 2023
Gram Panchayat Result : नांदेडमध्ये दोन गटांत दगडफेक; मतमोजणी करताना राडा...

नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. १७ पैकी १६ उमेदवार विजयी झाले असून, सरपंचपद हे ठाकरे गटाकडे आले आहे. राज्यात अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर अमोल कोल्हे अजितदादांच्या शपथविधी कार्यक्रमात होते; पण नंतर त्यांनी भूमिका बदलली. ते शरद पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमोल कोल्हेंचे गाव असलेल्या नारायणगावच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, पण येथे ठाकरे गटाने येथे बाजी मारली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का...

इंदापूरच्या शिंदेवाडी व वकीलवस्ती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली आहे. या निकालाने माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना धक्का बसला आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी सौरभ झगडे विजयी झाल्या आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह सद्स्यांच्या ९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या आहेत. वकील वस्ती ग्रामपंचायतमध्ये वनिता बाळू भोसले सरपंचपदी विजयी झाल्या आहेत, तर वकीलवस्तीच्या नऊ सदस्यांपैकी सहा राष्ट्रवादी, तर तीन भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

रांजणगावात शरद पवार गटाचा पराभव

रांजणगाव महागणपती ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. १३ जागांसह सरपंच पदावर ही अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ ३ जागांवरच शरद पवार गटाला समाधान मानावे लागले.

Gram Panchayat Elections Result 2023
Manoj Jarange : मनोज जरांगेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करणाऱ्या जखमी युवकाचा मृत्यू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com