Ahmedabad Plane Crash Sarkarnama
विदर्भ

Ahmedabad Plane Crash : आगीचे लोळ अन् धुरातनं वाट काढणारी 'ऐश्वर्या'!

Aishwarya Toshniwal of Akola Survives Gujarat Ahmedabad Plane Crash: गुजरात अहमदाबाद बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील ऐश्वर्या तोष्णीवाल धाडस दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे.

Pradeep Pendhare

Air India Plane Crash: अहमदाबाद इथं काल एअर इंडियाचं विमान उडताच, तीस सेंकदात मेघानीनगर इथल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यलायाच्या डाॅक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. लंडनला जाणार असल्याने विमानात लाख लिटरवर इंधन होते.

विमान कोसळात काही सेकंदात मोठा स्फोट झाला अन् धुराचे लोळ उठला. हे विमान ज्या वसतिगृहावर कोसळले तिथले काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झालेत. या विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावलीय. विमान ज्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कोसळले, तिथं स्फोटानंतर आगीच्या अन् धुराच्या लोळांपासून संरक्षण करताना, स्वत: भोवती ब्लँकेट लपेटून घेत, वाट काढत जीव वाचवला.

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद इथं भीषण विमान दुर्घटनेत अकोला इथली वैद्यकीय शिक्षण घेणारी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. अपघाताच्या वेळी ती वसतिगृहाच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. यामुळे वसतिगृहात चांगलाच गोंधळ उडाला.

वसतिगृहातील रूमवर झोपलेल्या ऐश्वर्याला यामुळे जाग आली. तेव्हा तिच्यासमोर काळाकुट्ट धुरामुळे अंधार होता. ऐश्वर्याला हिला परिस्थितीचं आकलन झालं. तिनं धैर्य दाखवत, आगीच्या (FIRE) अन् धुराच्या गर्दीतून वाट काढत वसतिगृहातून बाहेर पडली.

ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद इथं डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. झोपेत असताना अचानक मोठ्या आवाजाने आणि त्यानंतरच्या गोंधळाने तिला जाग आली.

ऐश्वर्याने उठून पाहिलं तर सर्वत्र आगीमुळे धुराचं धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच तिने स्वतःला ब्लँकेट लपेटलं अन् धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत वसतिगृहातून खाली उतरत स्वतःचा जीव वाचवला. आगीमुळे तिचा चेहरा, हात आणि पायाला भाजल्याच्या जखमा आहे.

ऐश्वर्याचा रडत रडत वडिलांना फोन

या दुर्घटनेमुळे घाबरलेल्या आणि रडवलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन लावला. ते त्या वेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी गेले. नातेवाईकांना याची कल्पना दिली. सर्वांनी मिळून ऐश्वर्याला दिलासा दिला.

ऐश्वर्या वडील हादरले

अमोल तोष्णीवाल यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या साम मराठी वृ्त्तवाहिनीला सांगताना वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालं. पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून बचावली.

यावेळी ऐश्वर्याची आई माधुरी अन् आजी-आजोबा यांच्या डोळ्यांतही अश्रू अनावर झाले. ऐश्वर्याच्या आजोबांनी नातं माझ्या वाढदिवसासाठी आली होती. पण अशा दुर्घटनेला तिला सामोरं जावे लागले. देवाचे शंभर वेळा आभार की ती सुखरूप आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

ऐश्वर्या म्हणाली, मी विसरू...

हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबीयांनी या दुर्घटनेत जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्या हिने माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता. जो मी कधीच विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT