Hanuman Gadhi News : अयोध्येमध्ये सोमवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यानिमित्ताने अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याने 11 लाख बुंदीचे लाडू तयार करून हा महाप्रसाद वितरित केला. यावेळी कारसेवक म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा नवनीत राणा व रवी राणा यांनी भगवी शाल व धनुष्यबाण देत सत्कार केला.
यावेळी फडणवीस यांनी पुन्हा अयोध्येमधील बाबरी ढाचा पाडण्यात माझाही सहभाग होता, याची आठवण करून दिली. काही दिवसआधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, की देवेंद्र फडणवीस त्यावेळी नव्हते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस आधी एका वृत्तपत्राच्या बातमीमध्ये आलेला फोटो मी आहे व मी कारसेवक म्हणून मी तिथे होतो, असं ट्विट केलं होतं व आज पुन्हा अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा कारसेवकांनी पाडला तेव्हा मी तिथेच होतो, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
आपण सगळे जण अयोध्येला जाऊ शकलो नाही, पण हीच आपली अयोध्या आहे, असे म्हणत त्यांनी यावेळी राणा दाम्पत्याचे कौतुक केले, तर भारत गुलामगिरीमधून आता बाहेर आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra modi) यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे, तर दोन्ही कारसेवेत मी स्वतः होतो. असा उल्लेख करीत त्यांनी त्यावेळी अनेकांना अटक करण्यात आली होती, त्यामध्ये मी स्वतः जेलमध्ये होतो. सोबतच लाठ्यासुद्धा खाव्या लागल्या व जेलमध्ये जावे लागले, असेही फडणवीस यांनी सांगितले,तर कारसवेकांनी कलंकाचा ढाचा खाली पाडला तेव्हा आम्ही आनंदी होतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
500 वर्षांनंतर राम अयोध्येत पुन्हा परतले व त्यांच्या जागी विराजमान झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे, तर आज अतिशय आनंदाची गोष्ट अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी कारसेवक म्हणून सेवा दिली होती. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या वतीने आज एक कारसेवक म्हणून त्यांना भगवी शाल, धनुष्यबाण देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हनुमानगढीवर सुरू असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
(Edited By Sachin Waghmare)
R...