Akola crime news : नाशिक, अमरावती मुलींच्या लैंगिक शोषण, धर्मांतराच्या प्रकाराने हादरलं असतानाच, अकोला इथंही लव जिहादच्या प्रकाराने तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रेमाच्या नावाखाली विवाहित मुस्लिम युवकाकडून हिंदू मुलीचं अपहरण करीत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
खदान पोलिसांनी (Police) या युवतीची सुटका केली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलिस ठाण्यात जमले होते. या वेळी 'लव जिहाद'चा आरोप करण्यात आला.
अकोला इथला जमीर जाहीरउद्दीन या मुस्लिम (Muslim) युवकाचे आधीच लग्न झाले असून, तो एकाचा मुलाचा बाप आहे. तो 'गेमिंग ॲप'वर 'बादशाह' या युजरनेम नावाने बनावट अकाउंट चालवतो. या माध्यमातून त्याच्या अनेक युवतींशी ओळख आहे. त्यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू युवतीसोबत त्याने जवळीक साधली, प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं.
यानंतर गीतानगर भागात स्वतः च्या घरात 5 दिवस ठेवलं. आईने रागवल्याने ही युवती घरातून निघून आली होती. हे तिने जमीरला देखील सांगितलं होतं. याचाच फायदा घेत, जमीरने, तिचा 'ब्रेन वॉश' करून स्वतःजवळ यायला भाग पाडल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात हरियाणा पोलिसात गुन्हा दाखल आहे. युवतीच्या शोधात तिचा भाऊ भाऊ अकोला इथं आला आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता, हे सर्व बिंग फुटलं. सध्या जमीर हा पोलिसांच्या ताब्यात असून आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटना या प्रकारावर आक्रमक झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाला लव जिहादची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदने केला आहे. पाच दिवसात युवतीसोबत काय घडलं, याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी हिंदू संघटनेने लावून धरली आहे. जमीरची आर्थिक परिस्थिती, कोणत्या संघटनांशी संलग्न आहे का, याचा देखील तपास झाला पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने लावून धरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.