

Ralegaon 34 girls missing : यवतमाळमधील राळेगाव इथून सहा महिन्यात गायब झालेल्या 34 हिंदू मुलींच्या प्रकारात पोलिसांना तपासाचा अँगल सापडला असून, यात मुलींची परराज्यात विक्री, धर्मांतराचे रॅकेट समोर येताना दिसत आहे.
तसंच, पोलिसांच्या प्राथमिक तपासात, यामध्ये दोन प्रकारच्या टोळ्या दिसत असून, मुलींना लग्न लावून देणे आणि माहेरी आले की परत न पाठवणे, असे फसवणुकीचा प्रकार समोर येताना दिसत आहेत.
या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा तपास पांढरकवडा उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी रॉबिन बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाने काल रात्री दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राळेगाव परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हिंदू (Hindu) मुलींना पळवून नेऊन त्यांची विक्री तसेच धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट राळेगाव मतदारसंघात सक्रिय असून मागील सहा महिन्यांत 34 आदिवासी मुलींची तस्करी झाल्याचा खळबळजनक दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
प्रफुल्ल चव्हाण यांनी आपल्या दावाला स्पष्ट करण्यासाठी, त्यांनी एका ‘ऑडिओ क्लिप’चा दाखला दिला होता. या आरोपांची दखल आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उइके यांनी घेत, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांची भेट घेतली. यानंतर ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेल्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री होत असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा भाजपचे प्रफुल चव्हाण यांचा आरोप आहे. या प्रकरणातील संशयित मुलींची विक्री करण्याच्या धंद्यासोबतच गोवंश तस्करी, क्रिकेट सट्टा, जुगार क्लब याशिवाय लव जिहादच्या कृत्यांमध्ये देखील, हे रॅकेट सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आरोपानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी, प्रफुल चव्हाण यांनी सादर केलेल्या आॅडिओ क्लिपची गांभीर्याने पडताळणी केली. यात ज्यांची नावे घेण्यात आली, त्यांना राळेगाव पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत पोलिसांच्या हाती या प्रकारामागे दोन प्रकारच्या टोळ्या दिसत असल्याचा आढळले. मुलींना लग्न लावून देणे आणि माहेरी आले की परत न पाठवणे, असा फसवणुकीचा प्रकार दिसत असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.