Devdndra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

हिंदूंची दुकाने टारगेट केली जात आहे, शांतता राखणे गरजेचे...

फडणवीस Devendra Fadanvis म्हणाले, सोशल मीडियावर टाकलेल्या चुकीच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहे. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. तो केलाच पाहिजे. पण अमरावती जिल्ह्यात जे मोर्चे काढण्यात आले, त्या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले. मोर्चेकऱ्यांनी हिंदूंची दुकाने टारगेट केली. हे सर्व प्रकार थांबले पाहिजे. अशा या परिस्थितीत शांतता राखणे आवश्यक आहे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, सोशल मीडियावर टाकलेल्या चुकीच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहे. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे. काल शुक्रवारी मोर्चादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर आजच्या बंदमध्ये तो व्हायला नको होता. पण आजचा बंद शांततापूर्ण मार्गाने सुरू असताना अचानक हिंसा उफाळून आली. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. ते करूनही आंदोलक नियंत्रणात आले नाही म्हणून मग पाण्याचा मारा करावा लागला. कुठूनतरी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होतोय, अशी शंका घ्यायला वाव आहे. परिणामी अमरावतीमध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले आहे.

मोर्चातून हिंदूंच्या दुकानांना मुद्दाम टार्गेट केले जात आहे. हे थांबायला हवे. त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. याचा आमीही निषेध करतो आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर शहराच्या एका गल्लीत अचानक शस्त्र बाहेर निघतात. त्यामुळे राज राजकमल चौकात घडलेला प्रकार पूर्वनियोजित होता का, असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. या प्रकारानंतर काही वेळात पोलिस येत असल्याची खबर मिळताच जमाव पुन्हा विखुरला. पण मिनीटामिनीटाला अमरावतीमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नवरात्रामध्ये बांगलादेशात दुर्गा मंडपाची मुस्लीम जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद त्रिपुरात उमटले, तर त्रिपुरातील घटनेचे पडसाद आता देश आणि महाराष्ट्रात उमटल्याचे दिसत आहे.

काल अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चातील जमावाने दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली होती. पोलिस आयुक्तांनी शांतता बाळगून घरी जाण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांना केले होते. त्यानंतर आजचा बंद घोषित करण्यात आला होता. पण आज बंद दरम्यान पुन्हा हिंसा उफाळून आली. जमावाने राजकमल चौकात दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. दरम्यान अनेक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT