Sameer Menghe vs ramesh bang .jpg Sarkarnama
विदर्भ

Nagpur News: धक्कादायक! एकाच पत्त्यावर दोनशे मतदारांची नावं; ZP निवडणुकीपूर्वीच नागपूरमधला आणखी एक मतदारसंघ सापडला वादात

Hingna ZP election 2025 : विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी घोळ असलेली मतदारयादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली होती. सुमारे 20 हजार नावांवर त्यांनी शंका व्यक्त केली होती. उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातून सुमारे 17 हजार मतांनी भाजप मागे होती.

Rajesh Charpe

Nagpur News: हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाने पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत असाच वाद निर्माण झाला होता. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी एकाच पत्त्यावर दोनशे मतदारांची नावे (Voter List) आढळली आहेत. आमदार समीर मेघे आणि माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बंग यांच्यातील शाब्दिक वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

आमदार समीर मेघे यांनी हे सर्व आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. मेघे परिवाराचे येथे 27 लोक राहतात. मेघे कुटुंब या परिसरात 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्याला आहेत. नीलेश मेघे आणि मुकुंद मेघे ही त्यांची नावे आहेत. बंग परिवारातील 30 जणांची नावे मतदारयादीत आहे. त्यापैकी 20 जण कुठे राहतात, याचा शोध त्यांनी घ्यावा. घोडमारे नावाचे 26 मतदारयादीत आहेत. मात्र, सहा कुठे राहतात याची माहिती कोणाला नाही याकडे मेघे यांनी लक्ष वेधले.

विजय घोडमारे याच मतदारसंघातून भाजपातून (BJP) निवडून आले होते. त्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढच्या निवडणुकीत ते मेघे यांच्याविरोधात लाढले. अलिकडे झालेल्या 2024 च्या निवडणुकीत पुन्हा रमेश बंग लढले. मात्र, दोघेही पराभूत झाले. मेघे यांनी वर्ध्यातून मतदार आणले. मतदारयाद्यांमध्ये घोळ केला. त्यांच्याच मालकीच्या शाळेमध्ये मतदान केंद्र होते, असे आरोप यापूर्वी घोडमारे यांनी केले होते.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी घोळ असलेली मतदारयादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली होती. सुमारे 20 हजार नावांवर त्यांनी शंका व्यक्त केली होती. उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातून सुमारे 17 हजार मतांनी भाजप मागे होती.

विधानसभेच्या निवडणुकीत मात्र समीर मेघे यांनी 78 हजार मतांची आघाडी घेऊन रमेश बंग यांना पराभूत केले. मतदारयाद्यांमध्ये काही पत्ते चुकीचे आहेत. हे मान्य करतो. मात्र, ती प्रशासकीय चूक आहे. मी किंवा भाजपने ती केलेली नाही. या आरोपावर एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे.

भाजपचे नगरसेवक ज्या ज्या लोकांची नावे मतदारयादीत आहेत. त्यांचे एक एक घर दाखवायला तयार आहे, असे सांगून त्यांनी आरोप करणारे रमेश बंग आणि विजय घोडमारे यांना आव्हान दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT