Sangli Politics: 'मविआ'साठी तीन कट्टर विरोधक नेत्यांचा पुढाकार; महायुतीवर भारी पडण्यासाठी पुण्यात गुप्त बैठक, 'प्लॅन' ठरला?

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महायुती एकत्र लढत असताना स्वतंत्र लढल्यास इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा इच्छुकांना होणार आहे.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती नियोजनामध्ये सरस ठरत असताना सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यामध्ये धडपडत आहे. अशातच खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात दौरे सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भूमिका काय असणार? याकडे इच्छुकांचं लक्ष लागून राहिले आहे.

महायुतीविरोधात लढत असताना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) एकजूट असावी, अशी इच्छुकांची भावना आहे. त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याची चिन्हे आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आणि ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सांगली जिल्ह्यातील दोन आमदार आणि एका खासदारांची पुण्यातील एका संकुलात बंद खोलीत बैठक पार पडली. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात हजर असलेले खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते.

MVA- Mahayuti
Baba Siddiqui mystery : बाबा सिद्दीकींची 'मर्डर मिस्ट्री' सुटेना : वर्षभरात 27 जण गजाआड, पण पोलिसांना मास्टरमाईंड सापडेना!

निवडणुकीच्या तोंडावर यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना किती एफआरपी द्यावी. या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचा हंगाम कधी सुरू करावा. याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या 16 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24 वी ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर आवाज उठवला जाणार आहे. साधारण त्यानंतरच सांगली जिल्ह्यातील उसाची एफ आर पी आणि हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

MVA- Mahayuti
Chhagan Bhujbal : मी फार फार तर मोदीसाहेबांकडे जाईल, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन भुजबळांचे मोठे विधान

दरम्यान, सांगली कुपवाड महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद, जिल्ह्यातील नगरपरिषदा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये भूमिका काय असावी, यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी पुण्यात यासंदर्भात बैठक झाल्यानंतर इच्छुकांच्या अशा पल्लवीत झाले आहेत.

महायुती(Mahayuti) एकत्र लढत असताना स्वतंत्र लढल्यास इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा इच्छुकांना होणार आहे. त्यामुळे पुण्यातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? हे माहिती करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची फोन वाजत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com