Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : विधानसभेला किती लीड? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

South-West Nagpur Assembly Election :लोकसभा निवडणुकीत भाजपचे दावे फसले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पाच लाखांचं लीड मिळेल असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात दीड लाखांच्या लीडचा आकडाही त्यांना गाठता आला नाही.

Rajesh Charpe

Nagpur News: लोकसभा निवडणुकीत भाजपचे दावे फसले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पाच लाखांचं लीड मिळेल असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात दीड लाखांच्या लीडचा आकडाही त्यांना गाठता आला नाही.

हे बघता भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या निवडणुकीत किती लीड असणार हे सांगणं टाळलं आहे.

फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "लीड सांगणार नाही, मात्र जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. मी निवडून येणार याचा विश्वास आहे." फडणवीस यांनी आपल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून गुलाबी जॅकट घालून उमेवादीर अर्ज दाखल केला.

यावेळी ते म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राची प्रचंड प्रगती झाली असल्याने पुन्हा महायुतीचेच (Mahayuti) सरकार राज्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर गुलाबी जॅकेटबाबत बोलताना ते म्हणाले, "यामागे काही कुठला अजेंडा नाही. मी वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट नेहमच घालतो. माझ्या मनातला रंग भगवा असला तरी मला सर्वच रंग भावतात."

लाडक्या बहिणी भरभरून प्रेम देतात

काँग्रेसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची भूमिका ठेवणे आवश्यक आहे. ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते होते. म्हणूनच ते राहूल गांधी यांच्या आरक्षणाच्या भूमिकेचे समर्थन करतात.

मात्र, जो पर्यंत भारताचे संविधान आहे आणि भाजप आहे. तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही. नाना पटोले यांनी राहूल गांधी यांचं अंध समर्थन करावे कारण त्यांचे भवितव्य त्यांच्यावर अवलंबून आहे. मात्र त्यांनी आपले विचार आमच्यावर लादू नये. आम्हाला आमच्या लाडक्या बहिणी भरभरून प्रेम देतात, असं म्हणत त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला.

तसंच यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्या डायरीने काही फरक पडत नसल्याचं म्हटलं. शिवाय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले ते खरे असते. मनाने कादंबऱ्या लिहल्या की ती डायरी होत नाही. सुप्रीम कोर्टाने देशमुखांबाबतच्या आदेशात काय म्हटले, ते बाघा, ते सर्वांचे लक्षात येईल, असंही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT