Maharashtra Assembly Elections: उमेदवार खिसा सैल सोडणार; खर्चाची मर्यादा एवढ्या लाखानं वाढली

Maharashtra Election Commission: महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा उमेदवारांना खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे काही पक्षांनी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती.
Assembly Elections
Assembly ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोणतेही निवडणूक आली की, खर्च आलाच. जिंकण्यासाठी 'होऊ दे खर्च', अशी उमेदवारांची भूमिका असते. निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना खर्चाच्या मर्यादा घातल्या आहेत. तसा तपशील प्रतिदिन द्यावा लागतो. यात खर्चाच्या मर्यादेत निवडणूक आयोगानं वाढ केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना 40 लाखापर्यंत खर्च करता येणार आहे. यापूर्वी 28 लाख एवढी खर्च मर्यादा होती. यात निवडणूक आयोगानं 12 लाखांची वाढ केली आहे.

विधानसभेच्या 288 मतदारसंघात उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये लढत असणार आहे. तिसरी आघाडी, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे फॅक्टर निवडणुकीत काय रंग दाखवतो, याकडे लक्ष लागलं आहे. ऐन दिवाळीत निवडणूक होत असल्याने उमेदवारांचा अप्रत्यक्ष खर्च रेकाॅर्ड ब्रेक होईल, अशी चर्चा आहे.

Assembly Elections
Aditya Thackeray : संपत्तीने कोट्यधीश असलेले आदित्य ठाकरेंवर आहेत एवढे गुन्हे

अत्याधुनिक काळात निवडणुका प्रचंड खर्चिक होत चालल्या आहे. निवडणूक (Election) आयोगाने यंदा उमेद वारांना खर्चाची मर्यादा 28 लाखाहून 40 लाख केली आहे. हा खर्च रेकाॅर्डवर येणार आहे. परंतु उमेदवारांचा छुपा खर्च वेगळाच असणार आहे. तो अधिक असू शकतो. याशिवाय पक्षाकडून होणार खर्च वेगळा असतो. त्यामुळे राज्यातील विधानसभेची यंदाची निवडणूक सर्वाधिक खर्चिक आणि महागडी निवडणूक ठरेल. ही निवडणूक सर्वांच्याच आठवणीत राहील, असे असेल, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Assembly Elections
Top 10 News : महायुती सरकारची अखेरची रेकॉर्डब्रेक मंत्रिमंडळ बैठक; प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर पलटवार - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देखील दिलं जात आहे. मर्यादेत खर्च होतो की, नाही त्याची तपासणी प्रतिदिन होते. त्यामुळे उमेदवारांना प्रतिदिन खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. या तपशीलाची 'क्राॅस' तपासणी होते. यात तफावत आढळून आल्यावर त्यावर कारवाई होते.

यंदा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढली आहे. महागाईत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी विविध पक्षांनी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादी वाढवल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com