Dilip walse Patil_Sameer Wankhede-Nawab Malik Sarkarnama
विदर्भ

वळसे पाटलांनी नवाब मलिकांना पाडले तोंडघशी : वानखेडेंवर कारवाईचा प्रश्नच नाही

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काय केलेले आरोप आपणास माहीत नाही.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काय केलेले आरोप आपणास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. गृहमंत्री यांच्या वक्तव्यामुळे मलिक यांना तोंडघाशी पाडल्याचे बोलले जात आहे. (I don't know what Nawab Malik said: Home Minister Walse Patil)

मलिक यांच्या जावयाला वानखेडे यांनी अमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी अटक केली होती. ते तब्बल 7 महिने पोलीस कोठडीत होते. तेव्हापासून मलिक आणि वानखेडे यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष सुरू आहे. मलिक यांनी वानखेडे यांना नोकरीतून घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा आज (ता. २१ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना दिला. महिन्याभरापासन मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, गृहमंत्री पाटील यांनी आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गृहमंत्री आजपासून तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज रात्री नऊच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मलिक यांच्या वक्तव्याबाबत कानावर हात ठेवले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग सध्या कुठे आहेत, अशी विचारणा केली असता, ते मलाही माहिती नसल्याचे हसून सांगत उत्तर देणे टाळले. औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या घटना ही गंभीर बाब आहे. आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून लवकरच त्यांना अटक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर विमानतळावर त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, माजी नगरसेवक राजेश माटे आदींनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT