झेडपी अध्यक्षांसाठी टक्केवारी मागणाऱ्या पीएला नोटीस

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देत स्वीय सहाय्यक मोहिते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
solapur zillha Parishad
solapur zillha ParishadSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांच्यावर टक्केवारीचा आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ता. ११ ऑक्‍टोबरला बजावलेल्या नोटीसवर स्वीय सहाय्यक मोहिते काय खुलासा देणार? यावर याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. (Show cause notice to Solapur Zilla Parishad President's PA seeking percentage )

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे स्वीय्य सहाय्यकामार्फत फाईल मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी केला होता. यासंदर्भात प्रसार माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या सर्वांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वीय्य सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस ११ ऑक्‍टोबरला बजावली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अधीक्षक) या पदावर कार्यरत असलेल्या मोहिते यांना ही नोटीस शिक्षण विभागाने बजावली आहे.

solapur zillha Parishad
शिवसेनेत वाद पेटला : भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचा टोला

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत या संदर्भातील खुलासा द्यावा, अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे. मोहिते यांच्याकडून अद्यापपर्यंत खुलासा प्राप्त झालेला नाही. या खुलाशामध्ये ते काय माहिती देतात? यावर या प्रकरणाचे गांभीर्य अवलंबून आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देत जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक मोहिते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला १८ ऑक्‍टोबरला मिळाले आहे. हे पत्र मिळण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ११ ऑक्‍टोबरला स्वीय सहाय्यक मोहिते यांना नोटीस बजावली आहे.

solapur zillha Parishad
लाल दिव्यासाठी गद्दारी करणाऱ्या राणेंनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये

विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी शेवटची सभा

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. 25 ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने झाली नव्हती. सोमवारी अनेक महिन्यानंतर सभा ऑफलाइन पद्धतीने होत आहे. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या टक्केवारीचा विषय समोर आला आहे. आगामी निवडणुकांची आचारसंहिता पाहता जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची ही शेवटचीच सर्वसाधारण सभा मानली जात आहे. या सभेत टक्केवारीचा विषय पेटणार की एकमेकांचे कौतुक करत ही सर्वसाधारण सभा निरोप समारंभाची सभा ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com