Kunal Raut-Nitin Raut
Kunal Raut-Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

वडिलांच्या विरोधातही आंदोलन करणार : कुणाल राऊतांनी दिले आव्हान!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : तरुणांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल. तसेच, प्रसंगी आपले वडील ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या विरोधातही आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी दिला आहे. आपल्याच सरकारच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राऊत यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (I will also agitate against my father : Kunal Raut's challenge)

कुणाल राऊत हे नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी कुणाल राऊत यांनी वरील विधान केले आहे.

देशात आणि राज्यात आज तरुणांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः बेरोजगारीची मोठी समस्या आपल्या देशात आहे. ही समस्या सोडविण्यात केंद्र सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळं राज्यातील आपल्याच सरकारच्या आणि ऊर्जामंत्री असलेले आपले वडील नितीन राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कुणाल राऊत यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन प्रथम जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. त्यानंतर हीच स्पर्धा संपूर्ण राज्यात घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी शंभर रुपयांचा फार्म भरून रजिस्ट्रेशन करायचे आहे. बेरोजगारी, महागाई व इतर दोन विषय असणार आहेत. जिल्हातून निवडलेले स्पर्धक राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. त्यानंतर २ आक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी खासदार राहुल गांधी यांच्यासमोर ही स्पर्धा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT