मातोश्रीबाहेर येऊन दाखवा; शिवसैनिक काय आहोत, हे आम्ही दाखवतो : पेडणेकरांचे राणांना आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय वाचावं, हे सांगणारे तुम्ही कोण?
Ravi Rana-Kishori Pednekar
Ravi Rana-Kishori PednekarSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जर खरे हिंदू असतील तर त्यांनी हनुमान जयंतीदिनी मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करावे; अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा वाचणार, असे आव्हान बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिले होते. त्याला शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ‘हिंमत असेल तर मातोश्रीबाहेर येऊन दाखवा. शिवसैनिक काय आहोत, हे आम्ही तुम्हाला दाखवतो,’ असे प्रतिआव्हान दिले आहे. (We show you what a Shiv Sainik we are : Kishori Pednekar's challenge to Ravi Rana)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा आदेश ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याला आमदार राणा यांनी पाठिंबा दर्शविला आहे, त्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा लावण्यासाठी लाऊडस्पीकरचे मोफत वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. त्याला पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ravi Rana-Kishori Pednekar
राज ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात दाखल; हनुमान जयंतीनिमित्त महाआरती

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना माजी महापौर पेडणेकर म्हणाल्या की, स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी आमदार रवि राणा हे ‘मातोश्री’ला टार्गेट करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय वाचावं, हे सांगणारे तुम्ही कोण? तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांना टार्गेट करणे चुकीचे आहे. वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय करावे? असा सल्ला देण्याची राणा यांना गरज नाही.

Ravi Rana-Kishori Pednekar
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा राजीनामा घेण्याची तयारी दाखवताच काँग्रेसनं टाकला डाव!

दरम्यान, हनुमान जयंतीनिमित्त महाआरतीसाठी राज ठाकरे हे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौकात असणाऱ्या मारुती मंदिरात राज यांच्या हस्ते उद्या (ता. १६ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता ही महाआरती होणार आहे. तसेच, या वेळी हनुमान चालिसाचे सामूहीक पठणही करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com