Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar on Exit Poll : मलाच निवडून द्या, अशी जबरदस्ती मी जनतेवर करणार नाही; एक्झिट पोलनंतर मुनगंटीवार बोलले

Vijaykumar Dudhale

Nagpur, 02 June : विजय झाला तर माजाचं नाही आणि पराभव झाला तर लाजाचं नाही. मलाच निवडून द्या, अशी जबरदस्ती मी जनतेवर करणार नाही. जनतेला त्यांचे प्रश्न काँग्रेसचा उमेदवार सोडवू शकतो, असं वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानोत्तर कलचाचणी अंदाजाबाबत दिली.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) प्रतिभा धानोरकर ह्या आघाडीवर असून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) हे पिछाडीवर असल्याचे टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट यांच्या कलचाचणीत अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यावर मुनगंटीवार बोलत होते.

ते म्हणाले, देशात पुन्हा एनडीएचे (NDA) सरकार येईल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांमधून पुढे आला आहे, ही आनंदाची बातमी आहे. नरेंद्र मोदी यांनी विकास कामावर मतदान मागितले आहे. मागील दहा वर्षे काम केले आहे, आता पुढची पाच वर्षे तुमच्यासाठी काम करायचं आहे. हा देशच माझं कुटुंब आणि परिवार आहे, या भावनेतूनच त्यांनी काम केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीचे लोक खूप घाबरले होते, त्यामुळे एक्झिट पोलच्या चर्चेत जाणं टाळता आला तर बरं होईल, अशी त्यांची भावना होती. पण त्यांनी या चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे.

निवडणुकीतील पराभवावर पक्षाचे भवितव्य अवलंबून राहत नाही. संघटना, कार्यकर्ते, विचार आणि वैचारिक बैठक यावर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. मात्र त्यांनी पराभवानंतरही आपली नैतिकता आणि उद्दिष्ठ यामध्ये तसूभरही फरक केलेला नाही, असा दाखलाही मुनगंटीवार यांनी दिला.

चंद्रपूरमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी तयार नव्हतो, हे सर्वांना माहिती आहे. पण हायकमांडच्या आदेशानंतर मी लोकसभेची निवडणूक लढवली. मी १६ मार्च १९९५ रोजी पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हाचं ठरवलं होतं की विजय झाला तर माजाचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही.

मला निवडून दिलं तर मी जीव ओतून काम करेन, असं वचन मी मतदारसंघातील लोकांना निवडणुकीदरम्यान दिले आहे. मलाच निवडून द्या, अशी जबरदस्ती मी लोकांवर करणार नाही. मी निकालाबाबतही साशंक नाही. मी लोकशाहीतील मतदारांच्या अधिकाराबद्दल सांगत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT