Nagpur, 06 December : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा थाटात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध राज्यांमधील मुख्यमंत्री, नेते, उद्योगपती, सेलिब्रेटी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते.
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही नेता अथवा प्रतिनिधी शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. त्यांनी या सोहळ्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता, असे दिसून येते. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्याला शपथविधीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असा दावा केला आहे. निमंत्रण दिले असते तर शपथविधीला गेले असतो, असे सांगून आघाडीच्या नेत्यांवर गुगली टाकली.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते, असे सांगण्यात येते. राज ठाकरे आणि शरद पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे सोहळ्याला येता येणार नसल्याचे कळविले होते.
उद्धव ठाकरे यांनी यावर काहीच मत व्यक्त केलेले नाही. महायुतीच्या नेत्यांनी शपथविधी सोहळ्याचे निरोप कोणाला दिले, कोणाला नाही, याची मला माहिती नाही. मात्र, मला निमंत्रण दिले नसल्याचेही या वेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावा, तरुणांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल. वर्षभरापूर्वी कंत्राटी भरती बंद करू, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. ती त्यांनी आता करावी. ते शब्द पाळतात. दोन लाखांपेक्षा जास्त जागा सरकारी कार्यालयात रिक्त आहेत. त्या तातडीने या सरकारने भराव्यात.
निवडणुकीपूर्वी सरकारने भरमसाठ योजना जाहीर केल्या होत्या. घोषणा केल्या होत्या. त्या आता बंद होणार नाहीत, याची सरकारने काळजी घ्यावी. सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याने त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारावी, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.