
Nagpur, 06 December : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सर्व मंत्रिमंडळ नागपूरसाठी हिवाळी अधिवेशनाला येणार आहेत.
दोन मुख्यमंत्री असल्याने सभागृहात कोण कुठे बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार त्यांना दुसऱ्या क्रमांकाची खुर्ची मिळणार आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तिसऱ्या क्रमांकाचे आसन कायम राहणार आहे.
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम हाती घेतले. प्राप्त माहितीनुसार व अधिकाऱ्यांनी दिलेल्या दुजोऱ्यानुसार १६ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. साधरणात: आठ दिवसांचे हे अधिवेशन राहणार आहे.
राजकारणात मानापानाला मोठे महत्त्व असते. पहिल्या रांगेत कोण बसले याचाही पसंतीक्रम ठरलेला असतो. एकादा नंबर जरी चुकला तरी नेते नाराजी व्यक्त करतात, तक्रारी करतात. त्यामुळे आसन वापट करताना अतिशय काळजी घेतली जाते. प्रोटोकॉल पाळला जातो. अजित पवार यांचा ज्येष्ठ सदस्यांमध्ये समावेश होता. सहावेळा त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेजारच्या खुर्चीत बसत असत. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचे आसन हलले. त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे बसत होते, याचे प्रमुख कारण ते माजी मुख्यमंत्री होते. प्रोटोकॉलनुसार त्यांचा पहिला मान आहे.
आता पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. सहाजिकच त्यांची खुर्ची आता अधिवेशनात पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील.
अजित पवार बाजूच्या रांगेतील तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे आसन राहणार आहे. हिवाळी अधिवेशनात आता एकनाथ शिंदे यांचा मुक्काम आता रामगिरीवरून देवगिरीवर हलणार आहे. अजित पवार यांच्याकडे विजयगड हा बंगला कायम राहणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.