Nago Ganar Sarkarnama
विदर्भ

Nagpur : गाणार भाजपचे नव्हते, तर मतेंना प्रमुख का केले? उमेदवारी देण्याचा अट्टाहास कुणाचा?

Responsibility for defeat : या पराभवाची जबाबदारी कुणाची, हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Division Teacher Constituency Election Result : नागपुरात पदवीधर मतदारसंघानंतर शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर या पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. पराभवाची जबाबदारी कुणीही स्वीकारायला तयार नाही. ज्येष्ठ नेतेही ‘गाणार आमचे उमेदवार नव्हतेच...’, असे सांगून हात झटकत आहेत.

त्यामुळे या पराभवाची जबाबदारी कुणाची, हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे. एकट्या नागपूर शहरातील आठ मतदारांसोबत साधलेला वैयक्तिक संपर्क आणि पाचही जिल्ह्यांत संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्यानंतरही भाजप समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार पराभूत झाल्याने भाजपचे नेतेच बुचकळ्यात पडले आहेत. याचे खापर कोणावर फोडावे, हेसुद्धा भाजपला कळेनासे झाले आहे.

दोन टर्म आमदार राहिलेल्या गाणार यांचा तब्बल आठ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीतच त्यांना चीत केले. नागपूर विभागीय पदवीधर पाठोपाठ विभागातील शिक्षक मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजपचे नेते चिंतेत पडले आहेत. आता गाणार भाजपचे नव्हे तर संघटनेचे उमेदवार होते, असे सांगून नेते जबाबदारी झटकत आहेत.

नागोराव गाणार भाजपचे उमेदवार नव्हते तर दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते (Mohan Mate) यांना निवडणूक प्रमुख का केले, भाजपने सर्व नेत्यांना कामाला का लावले होते, हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपने अलीकडेच शहरातील पाच जणांना पदाधिकारी केले. आमदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, संघटक अशी भलीमोठी फौज असताना या पराभवावर कोणी बोलायला तयार नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली जात नाही. हा विषय संपला असे सांगून नेते हात झटकत आहेत.

गाणार यांच्यावर नाराजी होतीच. तशी माहितीही त्यांना देण्यात आली होती. सर्वेतही गाणार पिछाडीवर असल्याचे दिसून आले होते. शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक उमेदवार ही निवडणूक (Election) लढण्यास इच्छुक होते. असे असताना गाणार यांनाच उमेदवारी देण्यामागे कोण नेता होता, याचा शोध घेतला जात आहे. आपण बरे आणि आपले काम बरे या स्वभावाचे गाणार आहेत. त्यांच्या राजकीय (Political) महत्त्वाकांक्षाही फार नाहीत.

दोन वेळा आमदार केल्याने त्यांची समजूत काढणे, त्यांना बसवणे फारसे अवघड नव्हते. असे असताना कोणीच त्यांना माघार घ्यायला लावली नाही. दुसऱ्याच्या माध्यमातून त्यांना संदेश देण्यात आले. थेट कोणी बोलायची हिंमत दाखवली नाही. तुम्हीच आपसात उमेदवार ठरवा, असे लेचेपेचे धोरण भाजपने (BJP) स्वीकारले होते. यावरून गाणारांमागे असलेल्या ताकदीचा अंदाज येतो. सुमारे आठ हजार मतांच्या फरकाने गाणारांचा एकतर्फी पराभव झाला त्यावरून मुद्दामच त्यांचा गेम केल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT