MLA Vinod Agrawal Office Sarkarnama
विदर्भ

अपक्ष आमदार अग्रवाल यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी एका शिवसैनिकाला अटक

Vinod Agrawal| Shivsena : अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Vinod Agrawal : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गट आणि आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. यामुळे राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने करत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत.

दरम्यान, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मात्र, कार्यालयावर हल्ला करणारे शिवसैनिक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने एका शिवसैनिकाला पोलिसांना अटक करण्यात यश आलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

अग्रवाल हे 2019 च्या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. तसेच अग्रवाल यांनी एकनाथ शिंदे यांनाही समर्थन देत असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं शिवसेनेच्या गोटात अशांतता पसरली होती. दरम्यान, अग्रवालांच्या कार्यालयावर आज (ता.27 जून) दुपारी शिवसैनिकांनी धडक दिली आणि कार्यलयाची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना पोलीसांच्या समोर घडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे.

दरम्यान, अग्रवालांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनाही कडक सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, अग्रवाल यांच्या घराजवळ फक्त दोनच पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे अग्रवाल यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं असून आमच्या जीवाला धोका असून पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणीही अग्रवाल कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त वाढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT