गद्दारांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही: आदित्य ठाकरे आक्रमक

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. बंडखोर आमदारांना ते म्हणाले की, थोडी लाज-लज्जा-शरम असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, जर पराभूत नाही केलं तर माझं नाव आदित्य ठाकरे लावणार नाही. तसेच, अश्या गद्दारांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, अश्या शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. ते कर्जत येथे बोलत होते. (Aditya Thackeray Latest Marathi News)

Aditya Thackeray Latest News
शिवसेना बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु!

आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोरांना पराभूत नाही केलं तर माझं नाव आदित्य ठाकरे लावणार नाही. ज्यांना मंत्रीपदावर बसवलं, लाखोंचा निधी दिला, ते निर्लज्जपणे वागले आहेत. बंडखोरांपैकी काही जण म्हणायचे की आम्ही बाप बदलणार नाही पण त्यातीलच काहींनी आयपीएलसारखा आपला लिलाव केला. पण मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजही आपल्या मागे भक्कम उभे आहेत. आपल्याच माणसांनी आपल्याला दगा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दगा दिला नाही. डोळ्यात डोळे घालून बंडखोरांनी मला सांगावं, तुमच्यासाठी काय कमी केलं?,असा सवालही त्यांनी बंडखोरांना केला आणि पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असे आव्हानही आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना दिले.

ते म्हणाले, मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे या मागे आहेत का? मात्र, कुणीही यामागे असले तरी महाराष्ट्र झुकणार नाही. कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा अस विचारलं तर गुवाहाटीला नेवून ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणाव लागेल, असा खोचक टोला भाजपला लगावला.

Aditya Thackeray Latest News
'प्रसाद घाबरू नकोस शिवसेना तूझ्या पाठीशी आहे'; आदित्य ठाकरेंनी सावंताना दिला धीर

परराज्यात जाऊन आम्हाला हिंदूत्व सांगू नका. केसरकर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर बोलतात. २०१२ साली बाळासाहेबांचं निधन झालं, त्याच्या २ वर्षानंतर म्हणजे २०१४ साली ते शिवसेनेत आले, आणि आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. हिंमत असेल तर समोर यावं, अजूनही काही आमदार मला फोन करत आहेत. त्यांना जर परत शिवसेनेत यायचं असेल तर उद्धव साहेबांची माफी मागा, मातोश्रीवर या, अन् पुन्हा शिवसेनेचा भगवा हातात घेऊन लोकांची सेवा करा. पण जर शिवसेनेत यायचं नसेल तर भाजपमध्ये, मनसे किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नाही", असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यांनी बंडखोरांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com