Uday Samant Google
विदर्भ

Uday Samant : उद्योगमंत्र्यांचा कानमंत्र : खरंच राबवायचं असेल बेरोजगारी हटवा; तर तरुणाईनं आता मधाचं गाव वसवा

Yavatmal Visit : राठोड्यांच्या जिल्ह्याला देणार कोट्यवधींचा निधी

सतीश हरिश्चंद्र येटरे

MIDC Review : नोकऱ्यांचं प्रमाण मर्यादित आहे. त्यामुळं तरुणाईनं आता स्वयंरोजगाराकडं वळलं पाहिजे. मध उत्पादनाचा व्यवसाय हा अलीकडच्या काळात बराच चालणारा उद्योग झाला आहे. त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाईनं ‘मधाचं गाव’ ही योजना राबवायला पाहिजे, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं.

नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर सामंत यांनी शुक्रवारी (ता. २७) यवतमाळ गाठलं. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राठोड पालकमंत्री असलेल्या यवतमाळमध्ये उद्योगांचा विकास कसा करणार याची यादीच पटापट वाचली. उद्योग क्षेत्रातील ही कामं पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च सरकार करणार असल्याची ग्वाहीच त्यांनी राठोड यांच्या उपस्थितीत दिली. (Industry Minister's Mantra: If you really want to implement, eliminate unemployment; So let the youth now build a village of honey)

मध उत्पादन आणि शेतीपूरक उद्योगातून तरुणाई स्वयंरोजगाराकडे वळणे शक्य आहे. नेर तालुक्यात नवी एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ६०० उद्योगांना मंजुरी दिली. त्यापैकी ३०० कार्यरत झालेही आहेत. यवतमाळातील एमआयडीसीत २५ एकरावर फूड पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे सामंत यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी यवतमाळ अतिरिक्त एमआयडीसीसाठी २६ कोटी ८३ लाखांच्या कामांना मान्यता देण्यात आलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किन्ही गावात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एमनाथ शिंदे यांच्यासह व देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपमुख्यमंत्रिद्वयदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार सत्तेवर आल्यापासून उद्योगांचा विकास अत्यंत सुसाट सुरू असल्याचंही त्यांनी अभिमानानं नमूद केलं.

औद्योगिक विकास महामंडळाने अनेक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत भाडेपट्ट्यावर भूखंड दिले आहेत. मात्र, अमरावती विभागातील ७७० औद्योगिक भूखंड वापरात नाही. हे भूखंड दिल्यापासून त्या जागेवर कोणताही उद्योग सुरू झाला नाही. यवतमाळ जिल्ह्यात असे १९८ भूखंड आहेत. हे सर्व भूखंड एमआयडीसी परत घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. नेर नजीक वटफळी येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्याचा निर्णय झालाय. लवकरच त्याचं कामही सुरू होईल, असं त्यांनी नमूद केलं. यवतमाळ जिल्ह्यासाठी पाच हजार कोटींच्या उद्योगांचा प्रस्ताव आहे. उद्योग विस्तारामुळे यवतमाळसह आसपासच्या तरुणांच्या हाताला काम निश्चित मिळेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. लवकरच नवी मुंबईतही हिऱ्याचा उद्योग सुरू होणार आहे. देशातील हा सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचा दावाही सामंत यांनी केला.

(Edited by : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT