Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

विदर्भावर पुन्हा अन्याय, दोन वर्षांपासुन नागपुरात अधिवेशनच नाही

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेंगाळत चाललेल्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Convention) तारखा अखेर औपचारिकरित्या घोषित झाल्या आहेत. 22 डिसेंबर रोजी मुंबईत हिवाळी अधिवेशन सुरु होईल. सध्या केवळ 24 तारखरपर्यंतचा कार्यक्रम ठरला असून त्या दिवशी पुढचा कार्यक्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवावी, असे आज सत्ताधाऱ्यांनी नमूद केले. मात्र, केवळ तीन दिवसांच्या या कार्यक्रमावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्याने आता शुक्रवार 3 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

25 डिसेंबरची नाताळाची सुटी लक्षात घेता अधिवेशन 24 तारखेनंतर सुरु राहील काय, असा प्रश्न केला जातो आहे.आज (ता.29 नोव्हेंबर) विधीमंडळात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारला अधिवेशनात रस नसल्याची आक्रमक भूमिका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मांडली. अधिवेशनाच्या तारखा ठरत नाहीत, कार्यक्रम निश्चित नाही, जनतेला दिलासा मिळणार तरी कसा, असा प्रश्न विरोधकांनी केला.

अतारांकित प्रश्न हे सरकार स्वीकारत नाही. त्यामुळे अधिकार्यांच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे महत्वाचे साधन विधिमंडळाच्या हाती असूनही त्याचा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त केली जात होती. सध्याच्या परिस्थितीत असा अंकुश ठेवणे शक्य नाही, असा मुद्दा पुढे आणला गेला. केवळ तीन दिवसांचे अधिवेशन हाही सांसदीय लोकशाहीवर घाला असेल असे आग्रही प्रतिपादन भाजपनेत्यांनी कायम ठेवल्याने अखेर पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्याचे निश्चित झाले.

सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा हा प्रयत्न

याच बैठकीत सलग दोन वर्षे विदर्भात अधिवेशन झाले नसल्याने तेथील जनतेत रोष पसरला आहे. या भावनेची दखल घेत आता अर्थसंकल्पाचे अधिवेशन नागपुरात घ्या अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाने दिले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवावा असा प्रयत्न आहे की, सत्ताधारी विरोधकांच्या रेटयापासून पळ काढण्यासाठी अधिवेशन गुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे यावर चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT