Devendra Fadanvis  
विदर्भ

ते सरकारी कार्यालय, कुणाच्या बापाचं नाही : फडणविसांनी सुनावले

अनुराधा धावडे

नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा मंत्रालयातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन राज्यसरकारने किरीट सोमय्यांना कारवाईचा इशाराही दिला. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी किरीट सोमय्यांना पाठिशी घालत, राज्य सरकारला सुनावलं आहे.

'या सरकारचं डोकं फिरलंय, अण्णा हजारेंच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार मिळाला, या अधिकाराने कुठल्याही कार्यालयात रितसर जाऊन चौकशी करण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना आहे, त्याच अधिकारात सोमय्या गेले होते. कागदपत्र तपासताना खुर्चीवर बसणे हा देखील अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांना पाठिशी घातलं आहे.

तर, हे सरकारी कार्यालय आहे ते कुणाच्या बापाचं नाही. जाणीवपूर्वक बापाचा शब्द वापरतो, कारण खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे नोटीस दिल्या जात आहेत. म्हणून कडक शब्द वापरतोय, किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्याचा अधिकार या सरकारला नाही. जो फोटो प्रसिद्ध झाला, त्याचा व्हीडीओ सीसीटीव्हीत आले, ज्यांनी फोटो काढले तेच तक्रारदार आहेत. ही सगळी मिलीभगत आहे. एकीकडे चोरी करायची, आणि दुसरीकडे बदनाम करायचं हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

ज्या प्रकारे देश पुढे चाललाय, शेवटच्या माणसाचा विचार करणारं केंद्र सरकार देशाला नव्या सोपानावर घेऊन जाईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी मुंबईतील मैदानाला टीपू सुलतानाचे नाव न देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

'ज्या टिपू सुलतानाने हिंदूंवर अनन्वीत अत्याचार केले तो टिपू सुलतान आमच्या देशाचा गौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं नावं महानगरपालिकेने मैदानाला देणं अयोग्य आहे. एक प्रकारे अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडल करण्याचं काम होत आहेत. त्यामुळे टिपू सुलतानाचे नाव देण्याचा निर्णय रद्द व्हावा,अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT