Nitin Deshmukh, Jay Malokar, Amol Mitkari Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari Vs MNS : मिटकरी अन् साबळेंमुळे जय मालोकारचा मृत्यू; ठाकरेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Nitin Deshmukh On Amol Mitkari And MNS Dispute : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील वाद काही थांबण्याचं नाव घेईना. अशातच आता मिटकरी आणि मनसे राडा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी खबळजनक आरोप केला आहे.

Jagdish Patil

Akola News, 03 August : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील वाद काही थांबण्याचं नाव घेईना. अशातच आता मिटकरी आणि मनसे राडा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी खबळजनक आरोप केला आहे.

अमोल मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांनी प्रसिद्धीसाठी हा कट रचला होता, अशी चर्चा शहरात सुरु असल्याचं वक्तव्य देशमुख यांनी केलं आहे. या दोघांच्या प्रसिद्धीच्या राजकारणात जय मालोकारचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आमदार नितीन देशमुख हे दिवंगत मनसे पदाधिकारी जय मालोकार (Jai Malokar) यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच मनसे आणि मिटकरी यांच्यातील वाद संपवावा असं आवाहन त्यांनी अमोल मिटकरी यांना केलं.

मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे वादावर बोलताना देशमुख म्हणाले, "जय मालोकारच्या आई-वडिलांना आणि भावांना भेटण्यासाठी मी आलो होतो. ही अत्यंत दु:खद घटना घडली आहे. भविष्यात डॉक्टर होणारा मुलगा आपल्यातून निघून गेला. त्याच्याबद्दल सर्वांना एक हळहळ आहे. मिटकरींना विनंती आहे की, हा विषय कुठेतरी बंद झाला पाहिजे. गाडीवर हल्ला व्हायला नको होता. पण शहरातला तरुण मुलगा गेला. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी फाटे फोडू नका ते योग्य वाटत नाही."

तसंच मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरी हे जवळचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी साबळे यांनी मिटकरींचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. आपल्या नेत्यावर मी आरोप करतो आणि तुम्ही असा हल्ला करा, असं या दोघांनी मिळून षडयंत्र रचल्याची चर्चा शहरात सुरु आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटले होते. त्यांची गाडी फोडण्याची ताकद मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे का? असं वक्तव्य मिटकरी यांनी केलं होतं. यावर बोलताना देशमुख म्हणाले, "मिटकरींनी स्वत:ची तुलना आदित्य ठाकरेंशी करू नये. कुठे आदित्य ठाकरे आणि कुठे अमोल मिटकरी?" असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT