Pune Congress : पुण्याचा शहराध्यक्ष बदलाची खलबतं दिल्लीत; अरविंद शिंदेंना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी, बागवेंची थेट खर्गेंकडे धाव

Pune Congress News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठांकडे केली होती.
Mallikarjun Kharge Pune Congress Workers
Mallikarjun Kharge Pune Congress WorkersSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 03 August : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला. सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कामगिरी उंचावलेली असताना पुण्यात मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवानंतर आता पुणे शहरात संघटनात्मक बदल करण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठांकडे केली होती. मात्र, सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आता पुण्यातील नेत्यांनी थेट दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली आहे.

आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पुण्यात (Pune) सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलं आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे.

त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज आहे.' असं या शिष्टमंडळातून सांगण्यात आलं होत. यावेळी पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्षपदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे. असं विचारलं असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचं नाव पुढे केलं होतं.

Mallikarjun Kharge Pune Congress Workers
Vikhe Patil Vs Thorat : विखे-थोरात यांनी एकमेकांच्या घराण्याचे छंदच काढले

या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर देखील प्रदेश पातळीवर शहराध्यक्ष बदलाबाबत कोणत्याही हालचाली झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यानंतर आता काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळाने खरगे यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली.

राज्य सरकारच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा कशा पद्धतीने वापर करून काँग्रेसला यश मिळवता येईल यासाठी काय करावे लागेल या संदर्भात या शिष्टमंडळाने खर्गे यांच्याशी चर्चा केली. यावेळी या शिष्टमंडळाकडून आगामी विधानसभा निवडणुकीबाबतचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये पुण्यातील शहराध्यक्ष बदलावा याबाबत देखील मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mallikarjun Kharge Pune Congress Workers
Shinde Govt : थोपटेंना अजितदादा अन् विवेक कोल्हेंना विखे-पाटलांशी पंगा घेणं पडलं महागात? शिंदे सरकारनं दिला धक्का

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याचे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांना बदलणे किती आवश्यक आहे. हे पटवून देण्याचा प्रयत्न या शिष्ट मंडळाकडून करण्यात आला आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मंत्री माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ खरगे यांच्या भेटीला गेलो होते. या शिष्टमंडळात रमेश अय्यर, चंदू कदम, जयंत किराड,नुरद्दीन इनामदार, विजय खळदकर, विशाल मलके, गौरव बोर्डे, यशराज पारखी, रामदास मारणे, गणेश जाधव, शानी नौशाद या काँग्रेसच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com