Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
विदर्भ

Gulabrao Patil : शिंदेंसोबत जाताना सर्व देव आठवले, राजकारणात भांडणावेळी भांडण करायचे !

सरकारनामा ब्युरो

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो.त्यांच्या घरी दहा दिवस गणरायाची स्थापना केली जाते. गुलाबराव पाटील यांनी आज सपत्नीक गणरायाची स्थापना केली. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. (Gulabrao Patil latest news)

राज्यात सत्तातर झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये गुलाबराब पाटील होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाताना आपल्या भावना काय होत्या याविषयी त्यांनी आज (बुधवारी) सांगितले.

"शिवसेनेने मला मोठे केले," असे म्हणणारे गुलाबराव पाटील हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले. त्यावेळची मनस्थिती काय होती याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी शिवसेनेबाबत सूचक विधान केले.

"एकनाथ शिंदे गटात सहभागी होताना मी जो निर्णय घेतला, त्यावेळी क्षणोक्षणी गणपती बाप्पाच नव्हे, तर अक्षरशः सर्व देव आठवत होते, अशी कबुलीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

"राजकारणच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात संकटेही येत असतात. त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो त्यावेळी सर्वच देव आठवले होते. देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळाले आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठीशी उभे राहतील, अशी माझी गणरायाकडे प्रार्थना आहे," असे गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही एकमेकांना गोळ्या घातलेल्या नाहीत

"राजकारणात भांडणावेळी भांडण करायचे, पण त्यासाठी वैयक्तिक संबंध खराब करण्यात अर्थ नाही. जूने सहकारी आज एकत्र आले, नशिबाला माणसाने ठोकायचे असते. राजकारणात हे चालतेच, प्रारब्धाशिवाय काहीच नसते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज वेगळे आहेत पण ते एकमेकांच्या दुःखात जात नाहीत असे नाही. आ्म्ही आज एकत्र आलो यात नवल नाही. आम्ही एकमेकांना गोळ्या घातलेल्या नाहीत," असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT