Jalna Maratha Andolan  Sarkarnama
विदर्भ

Jalna Maratha Andolan : मी पण मर्द मराठा आहे.., राडा केल्यास सोडणार नाही ; संजय गायकवाडांचा मराठा नेत्यांना सज्जड दम

Jalna Maratha Protest : विरोधीपक्ष आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Mangesh Mahale

Buldhana : मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मराठा समाजाकडून काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या (रविवारी) बुलढाण्यात 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मराठा समाजाकडून राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी मराठा नेत्यांना सज्जड दम भरला आहे. (Latest Marathi News)

"शासन आपल्या दारी कार्यक्रमात राडा करण्याचा प्रयत्न केल्यास तर मी त्यांना सोडणार नाही, राडा केल्यास मी पण मर्द मराठा आहे," असा इशारा गायकवाडांनी मराठा नेत्यांना दिला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

"मराठा समाजावर केलेला लाठीचार्ज अन्यायकारक आहे. पोलिसांनी केलेला लाठीचार्ज दुर्दैवी आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्याच्या आमच्या कार्यक्रमावर त्याचा परिणाम होणार नाही. उद्याचा कार्यक्रम यशस्वी होईल," असे गायकवाड यांनी सांगितले.

आंदोलक जखमींना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले जालना येथे जाणार आहेत. बीड, हिंगोली, धाराशिव लातूरमध्ये मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील एसटी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

आज नाशिक, मुंबई येथे मराठा समाजाची बैठक होत आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा निषेध मराठा समाजाने केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT