Devendra Fadanvis, Dr. Parinay Fuke and Manoj Jarange 
विदर्भ

Jarange Vs Parinay Fuke : जरांगे कुणाची ‘तुतारी’ वाजवून कुणाची सुपारी घेत आहेत, महाराष्ट्राला माहिती आहे !

Dr. Parinay Fuke : ‘हा’ तर मनोज जरांगेंचा पूर्ण बालिशपणा आहे.

अभिजीत घोरमारे

Jarange Vs Parinay Fuke : मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर जरांगे आता भाजप नेत्यांचे लक्ष ठरले आहे. आपल्या नेत्यावर टीका केल्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून मनोज जरांगे यांना आडव्या हाताने घेतले जात आहे. त्यात आता माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनीसुद्धा उडी घेतली आहे. मनोज जरांगे यांची स्क्रिप्ट बारामतीतून येत असून, जरांगे कोणाची "तुतारी" वाजवत आहेत, हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती असल्याचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके म्हणाले.

मनोज जरांगे हे शरद पवार यांनी लिहून दिलेली भाषा बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे हितचिंतक आहेत. त्यामुळेच 16 टक्के मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यांनी कोर्टात टिकेल असं मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मात्र, असे असतानासुद्धा मनोज जरांगे स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. 19 टक्के ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांचे आरक्षण मागणे हा जरांगेचा बालिशपणा आहे, असे डॉ. फुके म्हणाले.

या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात आहे. ते मनोज जरांगे यांना स्क्रिप्ट लिहून देत आहेत. मनोज जरांगे ती स्क्रिप्ट वाचून दाखवत असल्याचा आरोप डॉ. फुके यांनी केला. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच मिळालेले आरक्षणच योग्य आहे. मराठा समाजाने जरांगे यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करीत मनोज जरांगे आपली राजकीय पोळी शेकत असल्याच्या आरोप माजी मंत्री डॉ. फुके यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही आमच्या नेत्यांबद्दल वापरलेले अपशब्द कोणत्याही परिस्थितीत सहन करून घेणार नाही, असा इशारा डॉ. फुके यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून, आपल्याला सलाइनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणूनच सलाइन घेणं बंद केलं, असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काल (ता. 25) लक्ष्य केलं.

सागर बंगल्यावर येतो, आपल्याला मारून दाखवा, असं आवाहन करीत मनोज जरांगे या वेळी उपोषण मंडपातून उठून मुंबईकडे निघाले. मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू केले. त्यामुळे भांबेडी येथून जरांगे-पाटलांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला.

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करीत तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ही टीका झाल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या विरोधात जळजळीत प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT