Parinay Fuke and Sunil Kedar
Parinay Fuke and Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Kedar : परिणय फुकेंनी असे काय केले की; सुनील केदार म्हणाले, त्यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे!

सरकारनामा ब्यूरो

Pariny Fuke and Sunil Kedar News : महाराष्‍ट्राचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आम्ही अपेक्षेने पाहात आलो आहो आणि भविष्यातही पाहणार. त्यांनी कितीही वेळा आम्हाला नाही म्हटलं, तरी आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करणार आहे, असे माजी मंत्री आमदार सुनील केदार म्हणाले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. केदार म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वारसा घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. तो काही ना काही मिळवूनच राहतो. त्यामुळे बबनरावांनासुद्धा आता अधिक काळ वाट बघावी लागणार नाही. पक्ष त्यांचा विचार करत आहे. लवकरच त्यांच्या पदरात काही ना काही पडणार आहे. कारण त्यासाठी आम्ही अशोकरावांच्या मागे लागून ते काम करवून घेणार आहोत. ‘अशोकराव बडे दिल का आदमी है.’, असे ते म्हणाले.

माझ्या आधी ज्यांचे भाषण झाले ते भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी तर डॉ. बबनराव तायवाडे यांना थेट कॉंग्रेस सोडण्याचाच सल्ला देऊन टाकला. ते एकदम फ्री फ्लोमध्ये बोलले. आणि या मंचावर सर्व कॉंग्रेसचे नेते आहेत. भाजपचे डॉ. फुके एकटे आहे. तरीही त्यांनी बेधडक हा सल्ला देऊन टाकला. त्याच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, असे आमदार केदार (Sunil Kedar) म्हणाले. राजकारणात काम करत असताना काही गोष्टी काळासोबत होतात, तर काही गोष्टींसाठी वाट बघावी लागते.

परिणय फुके (Parinay Fuke) यांनी जो सल्ला दिला, तो मला मान्य नाही. कारण त्यांना आम्ही कधीच असा सल्ला दिला नाही. ते आमच्याकडे सहा वर्षांपूर्वी आले होते. तेव्हा आम्ही त्यांना योग्य सल्ला दिला, त्यांनीही तो मानला आणि काम केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर परिणय फुके आज एक दमदार नेता म्हणून उभा आहे. आमच्यातील एका व्यक्तीने येवढी मोठी मजल गाठली, याचा आनंद आहे.

डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्याबाबत बोलायचे झाले तर येथे मला माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची आठवण येते. ते नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे खासदार होते आणि थेट पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्यामुळे राजकारणात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. कर्तृत्वावर विश्‍वास ठेऊन काम करणाऱ्यांवर अन्याय होत नाही, असे आमदार सुनील केदार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT