Mahrashtra Politics | Bhendval Prediction
Mahrashtra Politics | Bhendval Prediction  Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics: राजा तणावात राहणार..; भेंडवळच्या घटमांडणीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य

सरकारनामा ब्युरो

Bhendvalchi Bhavishyavani: राज्यात राजकीय उलथापालथी होतील, राजा कायम तणावात असेल, यंदा पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, असे अनेक अंदाज भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहेत. संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेली भेंडवळची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली.यात राज्यातील पर्जन्यमानासह राजकीय भविष्यवाणीही करण्यात आली आहे. (King will be in tension..; The future of Maharashtra politics in Bhendval prediction)

संपूर्ण राज्याचं (Maharashtra Politics) आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलेली बुलढाण्यातील भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथील घटमांडणी पार पडली. यात राजा कायम तणावात राहिल आणि राजकीय उलथापालथी होत राहतील. राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. राजा कायम तणावात असेल आणि राजकीय उलथापालथ होत राहील. नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल नैसर्गिक आपत्ती येत राहतील, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

तसेच यंदा पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल, जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल आणि अतिवृष्टी देखील होईल, असेही अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यासोबतच पिकांवर रोगराई पडेल. कापसाचे पीक उत्पादन मध्यम प्रमाणात होईल, कापसात तेजी असेल. तूर, मुग आणि उडीद ज्वारी पीक सर्वसाधारण राहील. अशीही या भविष्यवाणी करण्यात आली आहे.

शेकडो वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करीत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं असतं. पाऊस पाण्यापासून राजकीय आणि हवामान, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थितीचा अंदाज व्यक्त केले जातात. (Political news)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT