Amritpal Singh Surrender | पंजाबचा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेतले आहे. तब्बल ३६ दिवसांनी अमृतपालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. याच दरम्यान त्याची फरार पत्नी किरणदीप कौर हिलाही तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावरून गुरुवारी (21 एप्रिल) घेतलं. (Khalistani supporter Amritpal Singh surrenders in Punjab)
अमृतसरच्या त्याच्या सर्व साथीदारांना आधीच अटक करण्यात आली होती. पोलिसांनी पत्नीवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतर त्यानेही आत्मसमर्पण केल्याचं सांगण्यात येत आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते. तो फरार असताना त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा त्याचे व्हिडिओही प्रसिद्ध केले होते. (Amritpal Singh News)
18 मार्च रोजी पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली मात्र अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते, मात्र तो सतत वेश बदलून पोलिसांपासून पळून जात होता. (Panjab news)
१४ एप्रिलला बैसाखीच्या दिवशी अमृतपाल शरण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्या अटकेसाठी केंद्रीय एजन्सी, गुप्तचर यंत्रणा यांच्यासह 20 हजार पोलिसांची फौज त्याच्या अटकेसाठी तैनात करण्यात आली होती. पण त्याला पकडण्यात यश आले नाही.पण त्याच्या पत्नीवर दबाव टाकल्यानंतर त्याने शरणागती पत्करल्याचे सांगितले जात आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.