Kunal Raut Sarkarnama
विदर्भ

Ambazari Police : कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

Nagpur University : कुणाल राऊत यांच्या विरोधात विद्यापीठाने काहीही कारवाई केली नव्हती.

Atul Mehere

Kunal Raut Arrested : राज्याचे माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांच्या विरोधात आज नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी कुणाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्रवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

पुतळा जाळण्यापूर्वी कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या दालनात जाऊन राऊत यांच्यासह १५ ते २० पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्यानंतरही कुणाल राऊत यांच्या विरोधात विद्यापीठाने काहीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे आज (ता. ८) दुपारी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संतापून सुरू असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. त्यानंतर आज राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात जाळपोळ करण्याचा प्रयत्न आणि विविध कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जय श्रीरामचे नारे लावत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी कुणाल राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठिय्या मांडला. विद्यापीठाची आज गुरुवारी दुपारी बारा वाजता व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी भाजपचे शहर पदाधिकारी आणि अधिसभा सदस्य विष्णू चांगदे आणि भाजयुमोच्या शिवानी दाणी यांच्यासह पन्नासावर कार्यकर्ते सभागृहात शिरले. यावेळी घोषणाबाजी करीत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळेसाठी स्थगित केली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी कुलगुरू आणि प्रकुलगुरूंच्या समोर ठिय्या मांडून तत्काळ कुणाल राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे तीन तास बैठक खोळंबली होती. काही वेळाने कुलसचिव डॉ राजू हिवसे हे स्वतः तक्रार घेऊन अंबाझरी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनतर त्यावरून कुणाल राऊत आणि त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT