Nagpur ZP : सुनील केदारांच्या फोटोवरून नव्या वादाला सुरुवात; नागपुरात रास्ता रोको

BJP Vs Congress : डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केला तीव्र विरोध
BJP Protest at Nagpur Zilla Parishan
BJP Protest at Nagpur Zilla ParishanSarkarnama
Published on
Updated on

Sunil Kedar News : नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवरून आता उपराजधानीत नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर माजी मंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांचा फोटो छापण्यात आल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आता आंदोलन सुरू केले आहे.

सुनील केदार यांच्या फोटोला विरोध व्यक्त करीत नागपूर जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात या आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे सोमवारी (ता. पाच) सिव्हिल लाइन्स येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘हायव्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला.

BJP Protest at Nagpur Zilla Parishan
Sunil Kedar : सुनील केदार यांना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेसमोर एकत्र आलेत आणि त्यांनी ठिय्या आंदोलन करीत रस्ता अडविला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या माजी मंत्री सुनील केदार यांचे छायाचित्र जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर छापल्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्प फाडून त्याची सभागृहाबाहेर होळी केली.

सभागृहातील सदस्यांचा रोष व्यक्त करण्याचा हा सनदशीर मार्ग असताना त्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंगला जाणीवपूर्वक काळे फासण्यात आले. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होत आहे, याप्रकाराचाही निषेध करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुनील केदार यांचा फोटो आणि मोदींच्या फोटोला फासलेले काळे याचा निषेध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंगला काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना कडक शिक्षा व्हावी

न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्ता असलेल्या काँग्रेसने बँक घोटाळ्यात दोषी ठरविलेल्या आरोपीचा फोटो का छापला असा सवाल यावेळी भाजपकडून करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाजवळ जवळपास सर्वच प्रशासकीय कार्यालय आहेत. महसूल आयुक्तालयासह केंद्र सरकारचीही अनेक कार्यालये येथेच आहेत. त्यामुळे या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले.

BJP Protest at Nagpur Zilla Parishan
MLA Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

एकीकडे देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महासत्ता होत असताना संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या बॅनरवर काळे फासणे हे अयोग्य आहे, असे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यावेळी म्हणाले. काँग्रेसमध्ये कोणचा पायपोस कोणाच्या पायात नाही. राज्यसभा निवडणूक होत आहे. अशात अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात ही बाब दिसेलच असे ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

BJP Protest at Nagpur Zilla Parishan
Sunil Kedar : सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झालेला नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा नेमका काय...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com