Kunal Raut and Shivraj More Sarkarnama
विदर्भ

Youth Congress News : कुणाल राऊत यांना दुसरा झटका; 7 महिन्यांपूर्वी केलेली पदाधिकाऱ्यांवरील कारवाई रद्द

Shivraj More Steps In: Youth Congress Decision : शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासह अनेकांवर कुणाल राऊत यांनी कारवाई केली होती.

Rajesh Charpe

Nagpur News : युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सांगण्यावरून निलंबित करण्यात आलेल्या चार पदाधिकाऱ्यांना नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांनी मोठा दिलासा दिला. युवक काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सर्वांचे निलंबन रद्द करून त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्त केली आहे. या निर्णयामुळे निष्ठावान व कार्यशील पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर झाला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर विद्रोही, महासचिव अनुराग भोयर, अक्षय हेटे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना सात महिन्यापूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. यावरून युवक काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

तत्पूर्वी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासह अनेकांवर कुणाल राऊत यांनी कारवाई केली होती. त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला होता. या विरोधात सर्वांची राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे दाद मागितली होती.

पक्षाच्या घटनेविरोधात कुणाल राऊत युवक काँग्रेसचा कारभार चालवत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. वारंवार वादग्रस्त व पक्षाच्या धोरणाविरुद्ध निर्णय घेत असल्याने कुणाल राऊत यांचे पंख छाटण्यात आले होते. शिवराज मोरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. कुणाल राऊत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करताच शिवराज मोरे यांची युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नियुक्त होताच मोरे दिल्लीवरून थेट नागपूरला आले होते. त्यांनी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा यांनी कायमस्वरूपी अपात्र करण्यात आलेल्या पत्राला रद्द करत पुन्हा त्यांच्याकडे असलेल्या पदावर चौघांची पुनर्नियुक्ती नियुक्ती केली. कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष व्हायचे होते. याकरिता त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्यांना त्यांनी निलंबित केले होते, असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा होता.

आता युवक काँग्रेसने इलेक्शन पद्धत सोडून पुन्हा सिलेक्शन ही पद्धत स्वीकारली आहे. इलेक्शन पद्धतीमुळे नेता पुत्र व पैसेवाले यांनाच अध्यक्ष होता येत होते. आता सर्वसामान्य व निष्ठावान कार्यकर्त्यांचा अध्यक्ष व युवक काँग्रेसचा पदाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची निवडणूक लढवली तेव्हा नितीन राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT