OBC Reservation : ओबीसी महासंघानेही उधळला गुलाल; फडणवीसांचा निरोप घेऊन आलेले मंत्री ठरले संकटमोचक

Minister Atul Save Plays Key Role in Talks : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन देऊन उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती मंत्री अतुल सावे यांनी केली होती.
Atul Save  Devendra Fadnavis
Atul Save Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात नागपूरमध्ये सात दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाची आज सांगता झाली. राज्याचे ओबीसी खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांची गुरुवारी भेट घेतली. महासंघाच्या 14 पैकी 12 मागण्या तत्काळ मान्य करण्यात आल्या.

हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे आश्वासन सावे यांनी यावेळी दिले. त्यानंतर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी साखळी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी मुंबईत आंदोलन सुरू केले होते.

जरांगे यांच्या आंदोलनात हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. सरकार त्यांच्या दाबावात येऊन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देईल, अशी भीती वर्तविली जात होती. त्यानंतर तायवाडे यांच्या नेतृत्वात तातडीने महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात ठरल्यानुसार 30 ऑगस्ट पासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण व त्यानंतर मुंबईत कूच करून आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

Atul Save  Devendra Fadnavis
वडील-आजोबांचा विक्रम मोडला; कोण आहेत 4 हजार कोटींच्या पॅलेसमध्ये राहणारे युवराज?

त्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महासंघालाही आता आंदोलन करण्याची गरज नाही असे सांगून ते मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र तायवाडे यांनी जरांगे यांच्याप्रमाणे शासनाच्या प्रतिनिधींनी आमच्याशीही चर्चा करावी, आमच्या मागण्या मान्य कराव्या असे सांगून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलकांची भेट घेण्याचेही आश्वासन दिले होते. गुरुवारी त्यांनी सरकाराचा प्रतिनिधी म्हणून अतुल सावे यांना पाठवले. त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन देऊन उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ती तायवाडे यांनी मान्य केली. यावेळी सावे यांनी महासंघाने केलेल्या चौदापैकी बारा मागण्या तत्काळ मान्य केल्या.

Atul Save  Devendra Fadnavis
Supreme Court : पोलिस कोठडीतील मृत्यू; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला झटका देणाऱ्या सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल

दोन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवल्या जाईल, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली केली जाईल असेही आश्वासन दिले. तायवाडे यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या असल्याचे जाहीर करून उपोषण स्थगितीची घोषणा केली. महासंघाच्यावतीने ज्या ज्या शहरात आंदोलन सुरू आहे त्यांनाही निरोप देऊन आंदोलन थांबवण्याचे सांगण्यात येईल, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com