Labor Protest in Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : बॉयलरवर चढलेल्या कामगारांच्या आंदोलनात ‘आप’ची ‘एन्ट्री’

संदीप रायपूरे

Demand To Implement Court Order : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्याकडून कामगारांच्या शोषणाचा आरोप होत आहे. अशात शनिवारी (ता. 2) चंद्रपूर-मूल रोडवरील चंद्रपूर फेरो अलाय प्लान्ट नामक कंपनीतील श्रमिकांनी बॉयरलवर वढत आंदोलन केलं. या आंदोलनात आता आम आमदी पार्टीनं उडी घेतलीय.

चंद्रपुरातील या कंपनीत गेल्या 30 वर्षांपासून अनेक कर्मचारी स्थायी स्वरूपात काम करताहेत. या कर्मचाऱ्यांना औद्योगिक ‘एस वन ग्रेड’ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. मात्र कंपनीकडून त्याची पूर्तता होत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. (Labors From Chandrapur District Private Company Protested By Climbing Boiler)

न्यायालयाचे आदेशही कंपनीनं मानत नसल्यानं थकलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या बॉयलरवर चढत आंदोलन केलं. शनिवारी दुपारी या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कंपनीचा परिसर गाठला. कर्मचाऱ्यांना खाली उतरण्याची विनंतीही पोलिसांनी केली. मात्र कर्मचारी न्यायालयीन आदेशांनुसार वेतनश्रेणीच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यामुळं तिढा वाढला.

न्यायालयातील निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजुने लागला आहे. अशात कंपनीचं व्यवस्थापन त्यानुसार कार्यवाही का करीत नाही, असा सवाल आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना केला. सीएफपी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात माणिक सोयाम, महादेव चिकटे, हेमलाल साहू, विनोद झामरे, मुसाफिर चव्हाण यांनी आपला लढा बॉयरलवरून कायम ठेवला. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. पोलिस आंदोलकांची मनधरणी करीतच होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता कंपनीच्या आसपास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकापाठोपाठ पोलिस ताफा चंद्रपूर फेरो अलाय प्लान्टच्या परिसरात दाखल झाल्यानंतर आम आदमी पार्टीनं या आंदोलनात उडी घेतली. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘आप’नं पाठिंबा देत त्यांचे मुद्दे लाऊन धरले. ‘आप’चे जेष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी घटनास्थळी गाठले. कोणत्याही परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी धमक्या देऊन कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी बाध्य करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलकांसह त्यांच्या परिवाराचा व राजकीय दबावही कंपनीच्या व्यवस्थापनावर वाढला आहे. या आंदोलनामुळं औद्योगिक परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही आंदोलकाला धमकी दिलेली नाही किंवा त्यांवर आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकलेला नाही, असं चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिस केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपलं काम करीत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT