Chandrapur Police News : ‘मटका किंग’च्या ठाणेदार मित्राला पोलिसांचे अभय

Ignorance In Inquiry : अर्थपूर्ण संबंधांची चौकशी झाल्यास आणखी अधिकारी येणार अडचणीत
Police Inspector Sudhakar Ambhore.
Police Inspector Sudhakar Ambhore.Google

Illegal Business : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे वादग्रस्त ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मटका किंगच्या वाहनातील प्रवासाचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. अंभोरे एक दिवसापूर्वी पोलिस खात्याच्या सेवेतून निवृत्त झालेत. मात्र, अद्यापही या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. चौकशी झाल्यास पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या प्रकरणावर पडदा टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे.

दारूबंदी असताना अंभोरे घुग्घुस पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीची बरीच चर्चा व्हायची. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची सूत्र त्यांच्याकडं देण्यात आली. शहर पोलिस ठाण्यातही ते कार्यरत होते. (Police Department Ignoring Inquire on Bramhapuri Police Inspector Sudhakar Ambhore Of Chandrapur District)

Police Inspector Sudhakar Ambhore.
Chandrapur News : ‘साहेबां’पुढं अश्रू गाळणाऱ्यांनीच पाठीत खंजीर खुपसला

अंभोरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हाफीज रहेमान यांच्यासोबत मैत्री झाली. हाफीजवर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीचं वाहन अंभोरे यांनी का वापरले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधी अंभोरे यांनी एका ट्र्रॅव्हल्स चालकाला मारहाण केली. त्यावेळी ते एका खासगी वाहनात होते. हे वाहन हाफीज रहेमानचे निघाले आणि अंभोरे यांचे बिंग फुटले. हाफीजच्या नावावर अंभोरे यांची आणखी दोन वाहनं असल्याची माहिती आहे.

मारहाण प्रकरणात टॅ्व्हल्स चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु सेवानिवृत्त होईपर्यंत हाफीजच्या नावावर अंभोरे यांच्याकडं असलेल्या वाहनांच्या चौकशीचा मुद्दा दुर्लक्षित केला. अंभोरे यांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यात ते दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सांगितले. गुन्हेगाराच्या वाहनात ठाणेदार प्रवास करीत असल्याचा पुरावा आढळल्यानंतरही पोलिस खातं आणखी कोणती सखोल चौकशी करतय हे कळेनासं झालंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घुग्घुस येथे एका प्रकरणात अंभोरे यांनी मारहाण केली होती. यासाठी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात 2012 मध्ये अंभोरे यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे ठाणेदार होते. त्याचवेळी ते हाफीजच्या संपर्कात आलेत. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. त्यावेळी वणी आणि चंद्रपूर व्हाया घुग्घुस हा दारूतस्करीचा मार्ग होता. अशातच योगायोगानं अंभोरे घुग्घुसचे ठाणेदार झालेत. या ठिकाणी त्यांनी बराच काळ ‘सेवा’ दिली.

घुग्घुसनंतर त्यांना जिल्हास्तरावर प्रचंड प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पाठविण्यात आलं. या काळात तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमसिंग राजपूत यांच्याशी अंभोरे यांचा झालेला वाद चांगलाचा गाजला. स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यकाळ संपल्यानंतर अंभोरे यांची नागपूरला बदली झाली. तिथेही त्यांना स्थानिक गुन्हे शाखाच मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. मात्र, त्यांना उमरेडला पाठविण्यात आलं. पुन्हा सहा महिन्यांतच त्यांनी पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेसाठी हातपाय हलविण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा योगायोग जुळून आला व त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत पाठविण्यात आलं.

Police Inspector Sudhakar Ambhore.
Chandrapur Crime : सीसीटीव्ही पाहिला अन‌् घरफोडीच्या तपासात पोलिसांना आपलाच ‘खाकी’वाला आढळला चोर

नागपुरातून अंभोरे चंद्रपूरला आलेत. परंतु त्यांना येथे स्थानिक गुन्हे शाखा मिळाली नाही. या शाखेत बाळासाहेब खाडे यांची वर्णी लागली. अंभोरे यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केलेत. कार्यकाळ संपण्यापूर्वीच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर बहाद्दुरे यांची बदली करण्यात आली व तेथे अंभोरे यांना नियुक्ती मिळाली. त्यानंतर ते ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात आलेत. येथे त्यांची पोलिस दलातील सेवा आता संपली आहे. परंतु अद्यापही त्यांच्याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी गरजेची झाली आहे.

Edited by : Atul Mehere

Police Inspector Sudhakar Ambhore.
Chandrapur : धानपिकाच्या नोंदणीसाठी मुदतीत डिसेंबर अखेरपर्यंत वाढ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com