Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

Ladki Bahin Yojana 3000 : लाडक्या बहिणींचा हप्ता 3000 रुपये करा; रवी राणांची फडणवीसांकडे मोठी मागणी

Ravi Rana seeks a hike in Ladki Bahin aid from ₹1,500 to ₹3,000 : रक्षाबंधनाच्या निमित्ताने रवी राणांनी मांडली मागणी; दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची फेरपडताळणी सुरू

Pradeep Pendhare

Maharashtra Ladki Bahin Scheme : रक्षाबंधन सणाचा मुहुर्त साधात, सत्ताधारी महायुतीमधील अमरावतीमधील आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लाडक्या बहिणींसाठी मोठी मागणी केली.

लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी प्रति महिना तीन हजार रुपये पगार करा, अशी मागणी आमदार राणा यांनी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची पुन्हा, दुसऱ्यांदा पडताळणीचे आदेश महायुती सरकारने दिले आहेत.

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या कार्यालयात, रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला. रवी राणा यांना राखी बांधण्यासाठी शेकडो महिलांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी बहिणींशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी राणा यांनी समजावून घेतल्या. तसेच लाडकी बहीण योजनेच्या मानधानातील वाढीबाबत मोठे विधान केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) रक्कम 1500 रुपयांवरून वाढवून थेट 3000 रुपये करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. लाडक्या बहिणींसाठी वेळ पडल्यास आमदार-खासदारांचे पगार कमी करा, मात्र बहिणींना मदत करा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.

रवी राणा लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये पगार करण्याची मागणी करत असतानाच, या योजनेतील लाभार्थ्यांची यादींची सरकारने केलेल्या फेरपडताळणीत आतापर्यंत 92 लाख अपात्र महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. आता पुन्हा सरकारकडून लाभार्थ्यांच्या यादीचे पडताळणीचे संकेत आहे.

राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांनाच आर्थिक लाभ मिळत आहे की नाही, याची पडताळणी करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाला केल्या आहेत. सुरूवातीला या लाभाचा काही पुरूषांनी, सरकारी नोकदारांनी देखील लाभ घेतला आहे. या लाभाच्या वसुलीचा देखील प्रश्न आहे.

जुलै-ऑगस्टचा हप्ता अजून जमा झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा नाही. या दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ते जमा होणार असल्याचे संकेत आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यावर दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी जमा होतील. परंतु, आमदार राणा यांनी केलेल्या मोठ्या मागणीवर सरकारकडून कसा प्रतिसाद येतो, याकडे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT