BJP Rishikesh Shete Attack : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षाला घेरलं; वाहनाची तोडफोड, 90 जणांवर गुन्हा

BJP leader Rishikesh Shete attacked in Nevasa; 90 booked, 8 arrested : अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवरून वाद; ऋषिकेश शेटे यांच्या वाहनाची तोडफोड, धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप
Rishikesh Shete
Rishikesh SheteSarkarnama
Published on
Updated on

Rishikesh Shete Attack in Nevasa : नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर गुरुवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेटे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली असून, त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सुमारे 90 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून झालेल्या वादातून घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. भाजपचे (BJP) ऋषिकेश शेटे यांनी संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीसाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, नेवासा नगरपंचायतीचे अतिक्रमणविरोधी पथक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. या पथकासोबत प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस (Police) कर्मचारीही उपस्थित होते. याचवेळी शेटे यांचे वाहन पथकाच्या मागून त्या परिसरातून जात होते. शेटे यांना पाहिल्यानंतर काही जण आक्रमक झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर जमावाने शेटे यांना लक्ष्य करत हल्ला केल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेटे यांचा बचाव झाला; मात्र त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.

Rishikesh Shete
BJP Dharmendra Pradhan : NEET-UG पेपरफुटी प्रकरण वाद पुन्हा तापला; धर्मेंद्र प्रधानांविरोधात तक्रार, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दावा

या घटनेत शेटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचेही समोर येत असून, या बाबत पोलिस तपास करत आहेत. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून निर्माण झालेला गैरसमज आणि त्यानंतरचा वाद हल्ल्याला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

Rishikesh Shete
Mumbai Mayor : मुंबई महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंचे ‘मिशन टायगर’? शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांवर नजर?

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आक्रमक जमावाला शांत केले. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी सुमारे 90 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ऋषिकेश शेटेंविरोधातही गुन्हा

सोशल मीडियावर उत्तर देताना धार्मिक भावना दुखावणारी टिप्पणी केल्याच्या आरोपावरून ऋषिकेश शेटे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी नेवासे खुर्द येथील इजाज मुख्तार शेख यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 23 ऑगस्टला रात्री फेसबुकवर ऋषिकेश शेटे या अकाऊंटवरील पोस्टवरील एका कमेंटला उत्तर देताना धार्मिक भावना दुखावणारी टिप्पणी करण्यात आली. या टिप्पणीचे स्क्रीनशॉट फिर्यादीने पोलिसांकडे सादर केले आहेत. सोशल मीडियावरील या टिप्पणीमुळे सामाजिक शांतता व सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

नेवासा का चर्चेत?

नेवासा तालुक्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरांनी याच ठिकाणी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहिल्याचे मानले जाते. तसेच तालुक्यातील शनि शिंगणापूर हे देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणाचा मुद्दा स्थानिक पातळीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com