Nana Patole and Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Lakhandur Flood News : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे नाना पुन्हा चर्चेत !

Bhandara News nana patole on PM Narendra Modi : मोदी भाजप किंवा आरएसएसचे पंतप्रधान नाहीत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावे.

अभिजीत घोरमारे

Bhandara District Flood News : ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, अन् मारूही शकतो’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यानंतर त्यांना देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. एवढेच काय, तर शेवटी त्यांना प्रसारमाध्यमांसमोर ‘मोदी’ उभा करावा लागला होता. आता मोदींबद्दल केलेल्या एका वक्तव्याने नाना पुन्हा चर्चेत आले आहेत. (Modi is not the prime minister of BJP or RSS. So they should speak carefully)

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाना आज (ता. २६) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा मतदारसंघ असलेल्या लाखादूर तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुराने बाधित झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पटोले म्हणाले, काल (ता. २५) भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस ज्या राज्यात जाते, त्या राज्याची नासधूस करते. अर्बन नक्षलवाद काँग्रेस चालवत आहेत, असाही आरोप केला होता. पंतप्रधान मोदींवर आज नानांनी पलटवार केला आहे.

देशाच्या संसदेत शेतकऱ्यांना खलिस्तानी आतंकवादी म्हणणारे पंतप्रधान आपण पाहिलेत आणि आता काँग्रेसला आतंकवादी असल्याचे जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भरवशावर जो प्रधानमंत्री झाला, तो सुपर आतंकवादी आहे काय, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

मोदींनी काँग्रेसवर आरोप करताना हा देशच आतंकवाद्यांचा आहे, असे भाष्य केले आहे. पंतप्रधान हे देशाचे आहेत, ते भाजप किंवा आरएसएसचे नाहीत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावं, अशी समजही नाना पटोले यांनी दिली आहे.

प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे आला पूर...

गोसीखुर्द धरण प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे भंडारा जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. पाऊस पडताच हळूहळू धरणाचे पाणी सोडणे गरजेचे असताना धरणाचे पाणी एकदम सोडल्याने पूरपरिस्थिती उद्भवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या धरण प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील शेती बुडाली. त्यामुळे धान नष्ट झाले आहे. आता सरकारने १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

येड्यांचे सरकार लवकर पडेल...

महाराष्ट्रातील येड्यांचे सरकार लवकर पडेल, असे भाकीत नाना पटोले यांनी केले. महाराष्ट्रात महायुतीमध्ये काही खलबतं सुरू आहेत. त्यामुळेच भाजपश्रेष्ठी सतत महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाह आणि आता जे. पी. नड्डा राज्यात आले, हे त्याचे संकेत आहेत. लवकरच भाजपमध्ये भूकंप येणार असल्याचे संकेत नानांनी दिले आहेत. शिंदे गटातील आमदार लवकरच अपात्र होतील, असेही संकेत नानांनी आज दिले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT