Laxman Hake Vs Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Hake Warning to Jarange: जरांगेचे मुंबई येण्यापूर्वीच विसर्जन करू! हाकेंनी दिला इशारा

पुन्हा एकदा हाके आणि जरांगे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येणार आहे.

Amit Ujagare

नागपूर : जरांगे पाटलाला दुसरा उद्योग नाही. दर चार दोन महिन्याने तो आंदोलन व उपोषण करीत असतो. आता तो शिवीगाळ आणि धमक्याही द्यायला लागला आहे. मात्र ओबीसी समाजाने काही बांगड्या भरल्या नाहीत. हे त्याने लक्षात ठेवावे. आम्ही त्याला मुंबईत पाय ठेवू देणार नाही त्या आधीचे त्याचे विसर्जन करू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. हे बघता हाके आणि जरांगे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येणार आहे.

जरांगे याला निवडणुकीच्या आधीच कसा काय जोर येतो अशी विचारणा करून हाके यांनी त्यांच्या मागे कुठली तरी राजकीय शक्ती असल्याचीही शंका व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस राज्याचे कॅप्टन आहेत. त्यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतात. जरांगे त्यांच्या नावाचा उल्लेख करून आंदोलन करीत आहेत. त्याच्या बॅनरवर अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकत आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांचा अपमान करीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ करीत आहे. असे असताना दोन्ही उपमुख्यमंत्री कसे काय सहन करतात असा सवालही हाके यांनी उपस्थित केला. तुमचा जरांगेच्या आंदोलना पाठिंबा आहे का अशी विचारणाही त्यांनी केली.

जरांगेला संविधान माहीत नाही. कायदा कळत नाही. राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. वाळू, मटका, गावठी दारू या गुन्हेगार यांच्या सर्कलमध्ये जरांगे वाढले आहेत. त्यांच्या मदतीने ते दहशत निर्माण करीत आहेत. मात्र जरांगे हा फुटकळ माणूस आहे. तो आमची आय काढत असेल, पुतळे जाळत असेल व आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. हे त्याने लक्षात ठेवावे. आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू. आम्ही ओबीसी असंघटित असलो तरी त्याला मुंबईत जाऊ देणार नाही. ओबीसीच्या रक्षणासाठी मी जीव हातात घेऊन फिरत आहे. माझ्या ओबीसीच्या रक्षणासाठी मी माझा बळी द्यायला तयार आहे. जरांगेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. मी लढणाऱ्याची अवलाद असे असे सांगून हाके यांनी जरांगे यांना उघड आव्हान दिले.

दादागिरी आणि वेठीस धरून आरक्षण मिळत नाही. हा देश संविधानावर चालतो. बोगस कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न जरांगेमार्फत केले जात आहे. मात्र त्या हा डाव आम्ही उधळून लावू. त्याने कितीही दहशत निर्माण केली तरी संविधानाने मराठा समाजाला आरक्षण भेटू शकत नाही. असे झाले तर देशभरातील ओबीसी संपलेला असेल असेही हाक यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT