100 Years of RSS: संघ भविष्यात कुठल्या कार्यात लावणार शक्ती? दिल्लीत होणार मंथन; रंजन गोगोई, कैलाश सत्यार्थी, कपिल देव लावणार हजेरी

100 Years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या दसऱ्याच्या दिवसापासून संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

100 Years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या दसऱ्याच्या दिवसापासून संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर संघाच्या थिंक टँकमध्ये आता पुढील काळात कशापद्धतीनं काम करायचं? कुठल्या मुद्द्यांवर काम करायचं? याबाबत मंथन करण्यासाठी दिल्लीत तीन दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला संघ प्रमुख मोहन भागवत हे हजेरी लावतीलच पण समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनाही या मंथन प्रक्रियेत सामावून घेतलं जाणार आहे. यामध्ये सध्या माजी सरन्यायाधीश आणि सध्याचे राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई, माजी क्रिकेटर कपिल देव आणि ऑलिम्पिक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्या नावाची चर्चा आहे. संघाचे प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी याबाबत मीडियाशी बोलताना माहिती दिली.

तीन दिवसीय संवाद कार्यक्रम

अंबेकर यांनी सांगितलं की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष सुरु होत आहे. येत्या २ ऑक्टोबर अर्थात विजयादशमीपासून हे शताब्दी वर्ष सुरु होत आहे. या शताब्दीवर्षानिमित्त संघाकडून समाजापर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाच्या उद्देशानं दिल्लीत एक विशेष आयोजन होणार आहे. २६, २७, २८ ऑगस्ट रोजी हा संवाद कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये समाजातील महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केलं जाणार आहे.

यावेळी पहिल्या दिवशी संघ प्रमुख मोहन भागवत हे संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत अनेक टप्पे, विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रमांची माहिती देतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चर्चासत्र आणि तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल. तसंच आगामी काळात संघ कोणत्या कार्यात आपली शक्ती लावणार? तसंच कोणत्या महत्वाच्या कामात आपल्या स्वयंसेवकांना कामाला लावणार? तसंच देशासमोर आणि समाजासमोर जे प्रश्न आहेत, त्यासंदर्भात मोहन भागवत तीन दिवस समाजातील प्रमुख लोकांशी संवाद करतील. संपूर्ण देशासमोर या संवादाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल"

Mohan Bhagwat
Smriti Irani: मोदींपाठोपाठ स्मृती इराणींच्याही पदव्या तपासण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती; CICला फटकारताना म्हटलं...

1300 मान्यवर लावणार हजेरी

या संवाद कार्यक्रमासाठी आम्ही विशेष करुन समाजातील विविध लोकांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये अनेक निवृत्त न्यायाधीश असणार आहेत, यामध्ये रंजन गोगोई असतील. त्याचबरोबर माजी राजदूत जसं की कंवल सिब्बल, वरिष्ठ पदांवर काम केलेले प्रशासकीय अधिकारी, कला क्षेत्रातील अनेकांना आमंत्रित केलं आहे, यात डागर बंधू. क्रीडा क्षेत्रातील अभिनव बिंद्रा, कपिल देव. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आमचं आमंत्रण स्विकारलं आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत आम्हाला १,३०० लोकांनी संवाद कार्यक्रमाला येणार असल्याचं कळवलं आहे. यामध्ये राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांचाही समावेश असेल. त्याचबरोबर अमेरिकेपासून चीनपर्यंत तसंच कुवेतपासून कझाकिस्तानपर्यंतचे जे विविध देशांचे दुतावास भारतात आहेत, त्यांच्या राजदुतांना देखील आम्ही आमंत्रित केलं आहे.

Mohan Bhagwat
Salary And Pension: खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन उद्या खात्यात होणार जमा! अजित पवारांची घोषणा

सर्व धार्मिक गटांना आमंत्रण

त्याचबरोबर ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, जैन अशा सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे. तसंच जे धार्मिक आणि आध्यात्मिक नेतृत्व करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगळा कार्यक्रम घेणार आहोत. तसंच एनजीओज किंवा विविध समाजांच्या संघटना, त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या संवाद कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. व्यापक स्वरुपात इथं चर्चा व्हावी हा यामागाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम जसा दिल्लीत होणार आहे तशाच स्वरुपाचे बंगळुरु, कोलकाता आणि मुंबईत देखील कार्यक्रम घेतले जाणार आहेत, अशी माहिती आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com