MLA Narendra Bhondekar, Bhandara.
MLA Narendra Bhondekar, Bhandara. Sarkarnama
विदर्भ

विधानपरिषद निवडणूक : सर्वच पक्ष संपर्क साधत आहेत, पण मी शिवसेनेसोबतच...

Abhijeet Ghormare

भंडारा : विधान परिषदेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. या निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे सर्वच पक्ष अपक्ष आमदारांची मनधरणी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत सर्व पक्ष आपल्याशी संपर्क साधत आहेत. पण मी कायम शिवसेनेसोबत असल्याचे भंडाऱ्याचे (Bhandara) अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

आमदार भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी आज हा गौप्यस्पोट केला आहे. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकरिता आपण शिवसेनेसोबतच (Shivsena) आहोत. सध्या जरी अपक्ष आमदार असलो तरी आधी मी शिवसेनेचा पदाधिकारी होतो. २००९ मध्ये शिवसेनेकडून आमदार झालो होतो. त्यामुळे मला सेना जो आदेश देईल, त्याप्रमाणे मी मतदान करेल, असेही ते म्हणाले. आपली जास्तीत जास्त कारकीर्द शिवसेनेमध्ये झाली आहे. मी मनाने शिवसैनिक आहे. त्यामुळे माझे मत इतरत्र जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असेही आमदार भोंडेकर म्हणाले.

शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आणि कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत. याशिवाय ९ अपक्ष आणि मित्रपक्षांचे ११ असे २० आमदारांचे समर्थन महाविकास आघाडीला आहे. या जवळपास १७३ आमदारांच्या संख्याबळावर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार सहज निवडून जावू शकतात. त्यातही राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवार यांच्या पराभवाने शिवसेनेला मोठा फटका बसला. त्यामुळे शिवसेना नेते यावेळी ताकही फुंकून पिणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतून धडा घेऊन महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात शिवसेना काय रणनीती आखते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असणार आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १०६ तर पाठिंबा दिलेले ४ अपक्ष आणि २ मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११२ होते. या संख्याबळानुसार भाजपचे २७*४ = १०८ म्हणजे ४ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर उर्वरित ४ मते गृहीत धरल्यास आणि भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी आणखी २३ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यावेळी काय रणनीती आखतात, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT