
Anil Deshmukh- Nawab Malaik news
मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीत मतदानाची परवानगी मिळावी म्हणून अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण त्यांना मतदानासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली.
त्यानंतर येत्या २० जून रोजी राज्यत विधान परिषदेची निवडणूकही होणार आहे. त्यासाठीही देशमुख आणि मलिक यांनी न्यायलयात मतदानासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज नवाब मलिक यांच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहेत तर उद्या अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता तरी देशमुख आणि मलिक यांना न्यायालय मतदानाची परवानगी देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात अनिल देशमुख यांनी सकाळी नऊ ते सहा या वेळेत विधानभवनात एस्कॉर्टमध्ये जाऊन मतदानाची परवानगी मागितली.पण न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या म्हणण्यानंतर येत्या बुधवारी (१५ जून) देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या देशमुख, मलिक कारागृहात आहेत.दोघांनी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्याला ईडीनं विरोध केला.
- राज्यसभेच्या निवडणूकीत नाकारली होती मतदानाची परवानगी
लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर ८ जून सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज ९ जूनला न्यायालयाने निर्णय दिला.
दोन्ही नेत्यांच्या अर्जावर ईडीने कायद्याचा हवाला देत मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले. ईडीने १९५१ कलम ६२(५) चा हवाला देत, 'जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, असं ईडीनं म्हटलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.