Complaint Filed by Chandrapur BJP. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धमकी

BJP Demands Action : भाजपनं केली पोलिसांकडे कारवाईची मागणी, गुन्हा दाखल

संदीप रायपूरे

Police On Alert Mode : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोशल माध्यमांवर यासंदर्भात पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकारामुळं खळबळ उडाली आहे. भाजपनं या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडं केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चंद्रपुरातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याकडून ही धमकी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दाम्पत्याकडून व्हिडिओत अपशब्दही वापरण्यात आले आहेत. (Life Threat To DCM Devendra Fadnavis & Forest Minister Sudhir Mungantiwar From Chandrapur BJP Demands Action)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे बाबा मस्की आणि शोभा मस्की वास्तव्यास आहेत. बाबा मस्की यांनी यापूर्वी राजुरा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट टाकली व व्हिडिओ व्हायरल केला. यात दोन्ही नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पारखी, अनुसूचित जाती मोर्चा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव जिवने, प्रमोद लांडे, संजय जयपूरकर, संतोष तेलीवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केला.

भाजप कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार नोंदविल्यानं पोलिसांनी मस्की यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. गडचांदूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत कारवाईला सुरुवात केली आहे. मस्की हे स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात होते. वेगवेगळ्या आंदोलनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त होत आहे. चंद्रपूर पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावं, मस्की यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सतीश धोटे यांनी पोलिसांकडे केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही मस्की यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 560 नुसार गुन्हा नोंदविला आहे. आमच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्याआधारावर कारवाई करण्यात आली आहे. असं पोलिसांनी सांगितलं. राज्यातील दोन महत्त्वाच्या मंत्र्यांना उघड धमकी आल्यानं पोलिस विभाग सतर्क झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. सुधीर मुनगंटीवार हेदेखील कॅबिनेट मंत्री असल्यानं त्यांनाही सुरक्षा कवच आहे. अशात पोलिस विभाग आवश्यक ती अतिरिक्त खबरदारी घेत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT