Chandrapur Crime : सीसीटीव्ही पाहिला अन‌् घरफोडीच्या तपासात पोलिसांना आपलाच ‘खाकी’वाला आढळला चोर

Amount Stolen : रामनगर पोलिसांनी केली स्थानिक गुन्हे शाखेतील शिपायाला अटक
Crime In Chandrapur
Crime In ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

Burglary Incident : चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील उपगन्लावर ले-आऊटचा भाग. घर कुलूपबंद करून येथील एक परिवार सौदी अरबला गेलेला. अशात माघारी घरफोडी होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना कळविलं जातं. रामनगर पोलिस घटनास्थळी येतात. सीसीटीव्ही फूटेज तपासतात. बघतात तर काय? चोरी करणारा आपलाच ‘खाकी’वाला. ते देखील गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्याची मोलाची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील. हा प्रकार पाहिल्यावर अधिकाऱ्यांना धक्काच बसतो. भानावर येत अधिकारी वरिष्ठांना माहिती देतात व चोरी करणाऱ्या त्या ‘खाकी’वाल्याला अटक करतात.

हे कुण्या चित्रपटातील कथानक नाहीये तर चंद्रपूर शहरात प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. पोलिस शिपायानचं घरफोडी केल्याचं उघडकीस आल्याचं जिल्ह्याच्या पोलिस दलात मोठी खळबळ उडालीय. अटक करण्यात आलेल्या शिपायाला न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावलीय. (Policeman from Local Crime Branch of Chandrapur District Arrested For Stealing Cash By Burglary)

चंद्रपुरातील तुकुम परिसरात असलेल्या उपगन्लावार ले-आउट मध्ये इस्माईल शेख हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ९ नोव्हेंबरला शेख दाम्पत्य सौदी अरबच्या मक्का मदिना येथे दर्शनासाठी गेले. शेख यांची मुलं नागपुरात राहतात. १५ नोव्हेंबरला त्यांचा मुलगा चंद्रपुरात घरी आला. त्यावेळी त्याला कुलूप नसल्याचं लक्षात आलं. घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं. कपाटातील १२ हजार रूपयेही गायब होते. त्यामुळं रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.

चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करून घेत रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला. परीसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्यात आली. तपास करताना पोलिसांना धक्काच बसला. स्थानिक गुन्हे शाखेत पोलिस शिपाई असलेला नरेश डाहुले यानेच चोरी केल्याचं निष्पन्न झालं. प्रकरण गंभीर होतं. त्यामुळं रामनगर पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना तातडीनं माहिती दिली. वरिष्ठांनीही ही बाब तपासली. चोरी डाहुले यानच केल्याची खात्री पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकाराची वार्ता जिल्हा पोलिस दलात पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली. रामनगर पोलिसांनी नरेशला कोर्टापुढं हजर केलं. कोर्टानं त्याची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेशने केवळ ही एकच चोरी केली की त्यानं अन्य काही गुन्हे केले आहेत याचा तपास आता रामनगर पोलिस करीत आहेत. परगावी जाण्यापूर्वी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, त्यानंतर गावाला जावं असं आवाहन राज्यभरातील पोलिसांकडुन करण्यात येतं. परंतु चंद्रपुरातील या प्रकारानंतर विश्वास तरी कुणावर ठेवावा असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडल्यावाचून राहणार नाही.

शेअरच्या वेडानं कर्जबाजारी

शहरातील या चोरी प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, नरेशला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगचं वेड होतं. त्यातून त्याच्यावर २२ लाख रुपयांचं कर्ज झालं. कर्ज फेडण्यासाठी रकमेची जुळवाजुळव करताना नरेशनं ही चोरी केली.

Edited by : Prasannaa Jakate

Crime In Chandrapur
Chandrapur Politics : काँग्रेसनं केलं आंदोलनाचं नियोजन, बीआरएसनं आधीच मारली बाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com